esakal | का मागितली बिग बींनी पुण्याच्या रश्मीची माफी...
sakal

बोलून बातमी शोधा

का मागितली बिग बींनी पुण्याच्या रश्मीची माफी...

का मागितली बिग बींनी पुण्याच्या रश्मीची माफी...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारा रियॅलिटी शो म्हणून केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीचे नाव घ्यावे लागते. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमानं लोकप्रियतेचे उच्चांक मोडीत काढले आहे. या कार्यक्रमामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होत असतात. महाराष्ट्रातल्या पुण्याच्या रश्मी कदमनं कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटपर्यत मजल मारली. तो शो आज टेलिकास्ट होणार आहे. त्या शो चा एक प्रोमो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात अमिताभ यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला रश्मीनं दिलेलं उत्तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस विभागात डीवायएसपी असणाऱ्या राजेंद्र कदम यांची मुलगी केबीसीमध्ये सहभागी झाली आहे. तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु आहे. रश्मीनं स्पोर्ट सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली असून ती त्या विषयाची प्राध्यापकही आहे. अमिताभ यांनी यावेळी रश्मीला तिच्या आवडनिवडीविषयी विचारले. तुला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे का, तुला भारताची खेळाडू व्हायला आवडेल का, असंही त्यांनी यावेळी विचारले. असे औपचारिक प्रश्न विचारताना बिग बींनी रश्मीला एक प्रश्न विचारुन कोड्यात टाकलं. तो प्रश्न रश्मीच्या पर्सनल लाईफविषयी होता. बिग बींनी मिश्किलपणे विचारलेल्या त्या प्रश्नावर रश्मीनं माझे वडिल पोलीसमध्ये आहेत. त्यामुळे माझ्याशी बोलायला बरेचजण घाबरायचे. कारण त्यांना माहिती होतं की, माझे वड़िल पोलीसमध्ये आहेत.

रश्मीच्या उत्तरानं प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या राजेंद्र कदम यांनाही हसू आवरले नाही. प्रेक्षकांनी देखील रश्मीच्या या उत्तराला उस्फुर्त दाद दिल्याचे दिसून आले. याप्रसंगी अमिताभ यांनी कदम यांच्याकडे पाहत आपल्याला क्षमा करावी. असे म्हणत शो ला सुरुवात केली. त्या प्रश्नानं मात्र उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. केबीसीच्या या पर्वामध्ये अमिताभ यांनी सहभागी स्पर्धकांना बोलतं करुन कार्यक्रमामध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

हेही वाचा: मॉस्को : चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाण

हेही वाचा: अमिताभ बच्चन व्हीकेसीचे ब्रँड ॲम्बेसेडर

loading image
go to top