esakal | अमिताभ बच्चन यांना फॅनचा फ्लाइंग KISS; बिग बी म्हणाले, मेरी शादी खतरे में..
sakal

बोलून बातमी शोधा

अमिताभ बच्चन यांना फॅनचा फ्लाइंग KISS; बिग बी म्हणाले, मेरी शादी खतरे में..

अमिताभ बच्चन यांना फॅनचा फ्लाइंग KISS; बिग बी म्हणाले, मेरी शादी खतरे में..

sakal_logo
By
अर्चना बनगे

कौन बनेगा करोडपती 13 च्या गुरुवारी रात्रीच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांमधील त्यांच्या एका महिला चाहत्याचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा चाहतीने अमिताभ बच्चन यांना फ्लाइंग किस केले, तेव्हा बिग बी लाजून लाल झाले. एवढेच नाही तर, मेगास्टारने विनोदाने त्या महिलेला सांगितले की अशा प्रकारे त्यांचे लग्न अडचणीत येईल.

स्पर्धक कल्पना दत्ताने 12,50,000 च्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले तेव्हा हा प्रसंग घडला. अमिताभ बच्चन प्रेक्षकांना त्या महिलेबद्दल गमतीने म्हणाले की, 'मॅडम बघा, इतके फ्लाइंग किस तुम्ही दिलेत की, तुमच्या फ्लाइंग किसने आमच्या वैवाहिक जीवनात आता मोठी अडचण येईल.

गेल्या महिन्यात नवीन पर्वासह छोट्या पडद्यावर कौन बनेगा करोडपती परतला. यावेळी विशेष 'फॅन्टास्टिक फ्रायडे' एपिसोडमध्ये काहीतरी खास पाहायला मिळेल. ज्यामध्ये सेलिब्रिटी हॉट सीटवर दिसतील. या आठवड्यातील स्टार स्पर्धक दीपिका पदुकोण आणि फराह खान आहेत.

केबीसी 13 च्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये फराह खान अमिताभ बच्चन यांची खिल्ली उडवली. फराह म्हणाली की, व्हेज बिर्याणी ही फसवणूक आहे. अमिताभ फराहला बिर्याणी न खायला दिल्याबद्दल चिडवतात. तर फराहने उत्तर दिले, सर तुम्ही शाकाहारी आहात आणि आमच्या घरात शाकाहारी बिर्याणीसारखी कोणतीही गोष्ट तयार होत नाही.

अमिताभ यांनी फराहला विचारले की, शाकाहारी बिर्याणीसारखी कोणतीही गोष्ट नाही असे तुम्हाला वाटते का? यावर फराह ने उत्तर दिले की याला 'वेजिटेबल पुलाव' म्हणतात. त्यानंतर त्यांनी गमतीशीरपणे टिप्पणी केली आणि केबीसी 13 च्या टीमला सांगितले, "ऐ गाड़ी मंगवाओ मुझे जाना है यहां से'. याच एपिसोडमध्ये दीपिका पदुकोणने अमिताभ बच्चन यांच्याकडे पती रणवीर सिंग यांच्याबद्दल तक्रारही केली होती. त्यानंतर बिग बींनी लगेच रणवीर सिंगला फोन केला.

loading image
go to top