esakal | अभिनेता रमेश वलियासाला यांचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता रमेश वलियासाला यांचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

अभिनेता रमेश वलियासाला यांचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं साऊथ मधील प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेता रमेश वलियासाला (Ramesh Valiyasala )यांचा राहत्या घरी मृत्यु झाला आहे. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांना त्यांच्या मृतदेहावरुन काही घातपात असल्याचा संशय आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. टॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं रमेश यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता. सोशल मीडियावरही ते अॅक्टिव्ह होते. एका वेगळ्या शैलीचा अभिनेता आज आपल्यातून हरपल्याची भावना साऊथ मधील सेलिब्रेटींनी व्यक्त केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. कारण ते त्यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन घेतली असून त्याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. रमेश हे दोन दिवसांपूर्वीच आपल्या एका प्रोजेक्टवरुन घरी परतले होते. ते आपल्या राज्यातील एक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी वेगवेगळ्या मालिकांमध्येही काम केले. त्यामुळे त्यांची स्टार मालिका अभिनेता म्हणूनही लोकप्रियता होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला. मात्र त्यांनी मालिकांमध्येच काम करणे पसंत केले.

रमेश यांच्या जाण्यानं तमिळ मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या जाण्यानं रमेश यांच्या मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन रमेश यांच्या परिवाराप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रमेश यांनी एक नाटक संस्थेत प्रवेश घेतला. तिथे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांनी काही नाटकांमधूनही काम केलं. गेल्या 22 वर्षांपासून त्यांनी मनोरंजन क्षेत्रात राहून प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. त्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या जाण्यानं एक दर्जेदार अभिनेता गेल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 'मुस्लिम म्हणून गणपतीची पूजा करायची नाही का?'

हेही वाचा: Ganesh Festival 2021 : बॉलीवूड सेलिब्रिटींचा बाप्पा; पाहा फोटो

loading image
go to top