
'माझी पोस्ट डिलिट करणार नाही,' कोर्टात केतकीचा युक्तिवाद, म्हणाली...
Ketaki Chitale Statement: केतकी चितळे सोशल मीडियावरील तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली (Viral News) टीका तिला भोवली आहे. तिला अटक करण्यात आली असून येत्या 18 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या त्या पोस्टमुळे राजकीय नेत्यांनी (Sharad pawar) प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. केतकीनं कोर्टात आपली बाजु मांडताना काही केल्या आपण ती पोस्ट डिलिट करणार नाही. असं सांगताना आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले आहे. केतकीला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
केतकीनं स्वत:चं कोर्टात बाजु मांडली. यावेळी ती म्हणाली, मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. तिच्या या वक्तव्याचा सोशल मीडियातून अनेक नेटकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मी ही स्वखुशीनं ही पोस्ट केली असल्याचेही केतकीनं कोर्टात सांगितले. कोर्टानं केतकीला 18 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या त्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निषेध नोंदवला होता. विचारांचा मुकाबला हा विचारांनीच करायचा असं सांगत केतकीनं ज्याप्रकारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या चुकीचे आहे असे ठाकरे यांनी म्हटले होते.
हेही वाचा: केतकी चितळे मनोरुग्ण, तिला येतो झटका किशोरी पेडणेकर संतापल्या
पोलीस कोठडीनंतरही केतकीच्या अडचणीत वाढ होणार का, तिला जामीन मिळणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे 18 मे च्या सुनावणीत कळणार आहे. केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा: "त्यात शरद पवारांचा..."; तृप्ती देसाईंनी केली केतकी चितळेची पाठराखण
Web Title: Ketaki Chitale Court Argument Viral Post Cant Be Deleted Statement On Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..