Ketaki Chitale: 'प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका! केतकी बोलली

दिवाळीच्या सरळ नव्हेच तर वेगळ्याच भाषेत शुभेच्छा केतकीनं आपल्या पोस्टमधून दिल्या आहेत.
Ketki Chitale
Ketki Chitaleesakal

Ketki Chitale post viral: मराठीतील मालिकामंधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टसाठी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीच्या तिच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. केतकीनं आपण कशाप्रकारे शुभेच्छा द्यायला हव्यात हेही सांगितलं आहे. त्यामुळे तिची ती पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे. नेहमीप्रमाणे केतकीला त्या पोस्टवरुन नेटकऱ्यांचा ओरडा खावा लागला आहे.

केतकीनं आपल्या पोस्टमधून शुभेच्छा देताना आपण जे इमोजी वापरतो ते चीनमध्ये नववर्षासाठी वापरला जातो. असे म्हटले आहे. त्यामुळे आपण तो वापरताना काळजी घ्यावी असे केतकीनं म्हटले आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये ती म्हणते, प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा शुभेच्छा आणि हॅप्पी या दोन्ही शब्दांमध्ये खूप अंतर आहे हे समजून घेण्याची गरज आहे. असे काही करुन आपण आपल्या धर्मामध्ये अंतर निर्माण करु नये.

Ketki Chitale
Prasika Vedpathak: 'जळू नका, बरोबरी करा!' नवऱ्याचा अपमान करणाऱ्यांना झापलं
Ketki Chitale post
Ketki Chitale post

केतकी ही नेहमीच तिच्या हटके आणि परखड प्रतिक्रियांसाठी ओळखली गेली आहे. तिच्या काही पोस्ट या कमालीच्या वादग्रस्त झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी तिनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. केतकी काही दिवस तुरुंगातही होती. असं असलं तरी केतकीनं आपला आक्रमकपणा सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिला आहे.

Ketki Chitale post
Ketki Chitale post
Ketki Chitale post
Ketki Chitale post
Ketki Chitale
Prasad Vedpathak Tweet: 'मी एकवेळ माफ करेन पण बायकोच्या नादी लागू नका'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com