Ketaki Chitale: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात केतकी चितळे म्हणाली, “मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास“ पोस्ट चर्चेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki Chitale

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात केतकी चितळे म्हणाली, “मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास“ पोस्ट चर्चेत...

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेण्ड आफताब पूनावाला याने तिला ठार मारून तिचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. श्रद्धा वालकर मर्डर केसनं अवघा देश हादरून गेला आहे. तपासामध्ये या मर्डरसंबंधी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

श्रद्धाच्या प्रियकराने सुनियोजित पद्धतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले. कोणी व्यक्ती इतका निर्दयी कसा असु शकतो? अनेक प्रश्न या हत्याप्रकरणानंतर उपस्थीत झाले आहे. त्यातच मराठी अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट आता चर्चेत आली आहे. (Ketaki Chitale post on Shraddha Murder Case )

हेही वाचा: Shraddha Murder Case : 'ही' वेबसिरीज पाहून आफताबने प्रेयसीच्या देहाचे केले ३५ तुकडे

या हत्येपूर्वी त्याने गुन्ह्यांसंदर्भातल्या अनेक वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले, ज्यामध्ये अमेरिकी सिरीज डेक्स्टर हिचाही समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. आणि डेक्स्टर या वेब सिरीजवरुन प्रेरणा घेत त्याने हा खून केल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे पोस्ट करत आपलं परखड मत मांडलं आहे. आणखी श्रद्धासारखे किती मुलींचा बळी घेतला जाणार असा प्रश्न तिने विचारला आहे.

सर्वांच्याच मनात याविषयी अनेक केतकीने देखील पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. केतकीने फेसबुक आणि तिच्या इंस्टाच्या अकाउंटला एक पोस्ट करत लिहिलं, 'मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना  कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा  विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात ? !!!? #जागोमेरेदेश ।।जय हिंद।। ।। वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय ।।असा हॅशटॅगही वापरला आहे.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

हेही वाचा: Shraddha Murder Case : "मला वाचव, तो मला मारुन टाकेल"; श्रद्धाचं मृत्यूपूर्वीचं मित्रासोबतचं चॅट समोर

प्रेम करा त्यावर काही मनाई नाही मात्र ज्यावर प्रेम करताय त्याच्यावर अंध विश्वास ठेवु नका. श्रद्धाला अलताफ आधीपासून मारहाण करीत होता. कितीकदा त्याने तिला बेशूद्ध होइपर्यन्त मारल्याचं तिच्या वडिलांनीही सांगितलंय. मात्र इतक असूनही श्रद्धा त्याच्यासोबत राहत होती. त्यामूळे केतकीने मूलींना तिच्या या पोस्टमधुन संदेश दिला आहे. केतकीच्या पोस्टची सोशल मिडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. अनेकांनी तिच्या या पोस्टचं समर्थन केलंय.