
केतकी चितळे प्रकरणावर मानसी नाईकची संतप्त प्रतिक्रिया, 'जे कुणी...'
Marathi Entertainment News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून तिला 18 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीनं (Ketaki Chitale) कोर्टात देखील आपण काहीही झालं तरी पोस्ट डिलिट करणार नाही असं सांगत अनेकांना धक्का दिला होता. आपल्याला बोलण्याचा व्यक्त (Social media viral news) होण्याचा अधिकार आहे. आपण काहीही चुक केलेली नाही. मुळात ती पोस्ट आपली नसून एकानं ती लिहिली होती. मी ती शेयर केली आहे. असा युक्तिवाद केला होता. तिच्या या युक्तिवादानंतर देखील मोठ्या प्रमाणात टीका केतकीवर झाली आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी देखील केतकीच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केतकीच्या त्या पोस्टवर टीका केली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातून देखील केतकीच्या पोस्टचा निषेध करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकनं आपल्या प्रतिक्रियेतून केतकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तिनं जे काही केलं ते आपल्याला आवडलं नसल्याचे मानसीचे म्हणणे आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मानसीनं म्हटलं आहे की, खरं तर मी जेव्हा हे वाचलं तेव्हा वाईट वाटले. कारण आपण मराठी आहोत. आणि आपण मराठी कलाकारांनी अशा प्रकारे कुणाबाबतही असं बोलणं चुकीचे आहे. ते लज्जास्पद आहे. मला ते आवडलं नाही. तिचे ते बोलणं. आपण सगळे शरद पवारांना ओळखतो. देशातच नव्हे तर बाहेर जगातही त्यांची वेगळी ओळख आहे. पवारांविषयी असं बोलणं वाईट आहे. केतकी जे बोलली त्यासाठी तिला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. वडिलधाऱ्या माणसांबद्दल कुणीच असं बोलता कामा नये. ज्यांनी कुणी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी दोनदा विचार करायला पाहिजे. आपण काय बोलतो आहोत याविषयी भान ठेवणे गरजेचे आहे. असेही मानसीनं आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याचे राजकारण, सामाजिक वातावरण एका वेगळ्या कारणानं चर्चेत आलं आहे. त्याचे कारण अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट. त्यामुळे तिची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी देखील तिनं केलेल्या पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता कायदेशीर रित्या केतकीवर कारवाई करण्यात येणार असल्यानं तिच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.