'रसिकच्या निधनानंतर मी 2 दिवसांतच...', केतकी दवेंनी घेतला मोठा निर्णय Ketki dave | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketki Dave resumed work two days after husband Rasik Dave’s death

'रसिकच्या निधनानंतर मी 2 दिवसांतच...', केतकी दवेंनी घेतला मोठा निर्णय

Rasik Dave & ketki Dave: आठवडाभर आधीच मोठी दुःखद बातमी सर्वांच्या कानावर पडली होती ती म्हणजे टी.व्ही अभिनेता रसिक दवे(Rasik Dave) यांचं किडनीच्या विकारानं झालेलं निधन. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना अनेक दिवस आजाराशी सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर मृत्यूनं गाठलंच. १५ दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते पण अखेर मृत्यूशी सुरु असलेल्या लढाईत ते हरले. रसिक दवे यांच्या पश्चात पत्नी, अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) आणि दोन मुलं,आई असा परिवार आहे. अभिनेत्याच्या जाण्यानं कुटुंब मात्र कोलमडलं आहे. आता अपडेट मिळाली आहे की रसिक दवे यांच्या निधनानंतर दोनच दिवसांत केतकी दवे शूटिंगवर परत आल्या आहेत. यामागचं नेमकं कारण काय यासंदर्भात आता केतकी दवे यांनी खुलासा केला आहे.रसिक दवे यांचे निधन २९ जुलै रोजी झाले,त्यांची पत्नी केतकी दवे ३१ जुलै रोजी कामावर रुजु झाल्या.(Ketki Dave resumed work two days after husband Rasik Dave’s death)

हेही वाचा: Madhubala यांच्या बायोपिकला बहिण मधुर भूषणचा नकार, आता निर्माते म्हणतायत...

एका इंग्रजी वेबसाईटशी साधलेल्या संवादा दरम्यान केतकी यांनी सांगितले की,''आपल्या वाटेला आलेल्या दुःखामुळे लोकांना त्रास व्हावा असं मला मुळीच वाटत नाही. मला नेहमी वाटत आलंय की लोकांनी माझ्या आनंदात सहभागी व्हावं,दुःखात नाही''. त्यानंतर जेव्हा केतकी दवेंना विचारण्यात आलं की,'पतीच्या निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडत,काम करणं हे सगळं इतक्या लवकर त्यांना कसं शक्य करता आलं?' तेव्हा त्या म्हणाल्या,''मी केतकी दवे तोपर्यंतच आहे,जो पर्यंत मी स्टेजवर जात नाही, एकदा का मी स्टेजवर गेले की माझ्या भूमिकेची होऊन जाते. केतकी दवेचे वैयक्तिक आयुष्य त्या भूमिकेच्या आड येत नाही''.

हेही वाचा: 'होऊ दे चर्चा,मी स्वतः ४ दिवसांनी..' बिग बॉस मराठी विषयी सिद्धार्थचा खुलासा

केतकी दवेंनी पुढे सांगितलं की,''सूरत मध्ये एका नाटकाचा शो होता,तेव्हा मी तिथे गेले होते. २9 जुलै नंतर मी एक दिवसही सुट्टी घेतली नाही, मी सतत काम करत आहे''. त्यांचे म्हणणे आहे की,त्यांना लहानपणापासून हिच शिकवण मिळाली आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम व्यावसायिक आयुष्यावर होऊ द्यायचा नाही. मी आजारी असतानाही माझं काम थांबवत नाही. कारण एखादया प्रोजेक्टमध्ये केवळ मी एकटीच सामिल नसते. यात संपूर्ण टीम सामिल असते. शो चे अॅडव्हान्स बुकिंग झालेले असतात. आणि मला वाटतं,माझ्यामुळे कोणाला अडचण निर्माण होऊ नये.

हेही वाचा: 'आईला ऐनवेळी लक्षात आलं म्हणून,नाहीतर मी...',दीपिका पदूकोण डोकावली भूतकाळात

केतकी दवे यांचे वय ६२ वर्ष आहे. त्या प्रसिद्ध अभिनेत्री सरिता जोशी यांच्या कन्या आहेत. त्यांनी गुजराती नाटकांपासून आपल्या करियरची सुरवात केली होती. पण त्यांना मोठी ओळख ही एकता कपूरच्या क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेपासून मिळाली. हिंदी आणि गुजराती सिनेमांमधूनही केतकी दवे यांनी काम केलं आहे. 'आमदनी अठन्नी खर्चा रुपइया', 'मनी है तो हनी है', 'कल हो ना हो' अशा अनेक सिनेमांतून केतकी दवे दिसल्या आहेत. त्या व्यतिरिक्त 'नच बलिये २', 'बिग बॉस २', 'क्यों की सास भी कभी बहू थी', 'बेहनें' या टी.व्ही शोज मधून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Web Title: Ketki Dave Resumed Work Two Days After Husband Rasik Daves

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..