'अनेक दिवसांनी सिद्धार्थ जाधव...' Big Boss सूत्रसंचालकाविषयी झाला खुलासा Siddharth Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Jadhav

'अनेक दिवसांनी सिद्धार्थ जाधव...' Big Boss सूत्रसंचालकाविषयी झाला खुलासा

Big Boss Marathi 4: बिग बॉस हा शो जेवढा हिंदीत गाजला,तेवढाच मराठीतही नेहमीच चर्चेत आला. हिंदीत सलमाननं तर मराठीत महेश मांजरेकरांनी(Mahesh Manjrekar) एक नंबर सूत्रसंचालन करत शो चा टीआपी वाढवण्यास मदत केली. आता बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चौथ्या पर्वाचं सूत्रसंचालन मांजेरकर करणार नाहीत अशी चर्चा रंगली,अन् यंदाच्या शो चं सूत्रसंचालन करण्यासाठी नाव समोर आलं सिद्धार्थ जाधवचं. गेल्या अनेक दिवसांपासून हीच चर्चा सुरु आहे. पण आता स्वतः सिद्धार्थनं(Siddharth Jadhav) सकाळ डिजिटल मीडियाशी बोलताना यावर खुलासा केला आहे.(Siddharth Jadhav Big Boss Marathi show Anchor? Actor Revealed)

हेही वाचा: Aamir Khan: दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर म्हणतोय, 'चुका केल्या, आता...'

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता थिएटरमध्ये सिनेमे रिलीज व्हायला लागले आहेत. सिद्धार्थही अनेक वर्षाच्या कालावधीनंतर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करताना दिसतोय. तमाशा लाईव्ह या म्युझिकल सिनेमानंतर आता सिद्धार्थ सुपरहिट दे धक्काच्या सीक्वेलच्या माध्यमातून समोर आला आहे. दे धक्का सिनेमाला समिक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. कलाकारांच्या भूमिकांचं कौतूकही होताना दिसतंय. पण अजून बॉक्सऑफिस गणित फारसं स्पष्ट झालेलं नाही. असो, आता दे धक्का रिलीज झाल्यानंतर पुन्हा चर्चा वळलीय सिद्धार्थच्या दिशेने.

हेही वाचा: 'आईला ऐनवेळी लक्षात आलं म्हणून,नाहीतर मी...',दीपिका पदूकोण डोकावली भूतकाळात

सिद्धार्थ जाधवला सकाळ डिजिटलच्या टीमनं संपर्क साधला होता. तेव्हा बिग बॉस मराठी ४ चे सूत्रसंचालन तू करणार अशी चर्चा सुरू आहे, त्याविषयी तुला काय म्हणायचंय? असा प्रश्न विचारला गेला. यावर तो म्हणाला,''अनेक दिवसांनी सिद्धार्थ जाधव हे नाव चर्चेत आहे तर येऊ दे. मला आवडत आहे. मी आताच यावर कोणतेही उत्तर देऊन माझ्याविषयीची चर्चा का थांबवू. थोडा धीर धरा. चार दिवस थांबा. मी स्वतः बातमी देईन''. याच संदर्भात कलर्स मराठीशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले,''अजून काहीच ठरलेलं नाही''. पण मांजरेकरच सूत्रसंचालन करणार की सिद्धार्थ जाधव? यावर मात्र कलर्सच्या अधिकाऱ्यानं एक स्माईल देत,मोठा पॉझ घेतला.

हेही वाचा: Madhubala यांच्या बायोपिकला बहिण मधुर भूषणचा नकार, आता निर्माते म्हणतायत...

त्यामुळे आता पहायचं चार दिवसांनी सिद्धार्थ नेमका कशाविषयी खुलासा करत आहे. की चार दिवसांनी बिग बॉस मराठीच्या प्रोमोमधून थेट तो आपल्या भेटीस येतोय,की त्याच्या विषयी सुरू असलेली चर्चा थांबवत वेगळीच बातमी देतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Siddharth Jadhav Big Boss Marathi Show Anchor Actor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..