KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला|KGF 2 Movie Yash Sultan song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kgf 2

KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला, सोशल मीडियावर चर्चा

KGF 2: कोरोनामुळे दोन वर्षे य़शचा केजीएफचा दुसरा चॅप्टर हा प्रेक्षकांच्या (Entertainment News) भेटीला येण्यासाठी तयार होता. मात्र त्याला काही यश आले नाही. अखेर उद्या हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यशनं बॉलीवूड प्रेक्षकांसाठी (Bollywood News) देखील केजीएफचं मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केल्याचे दिसुन आले आहे. सध्या सोशल मीडियावर केजीएफची मोठी क्रेझ (Bollywod Movies) आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. त्यामध्ये संजय द्त्त, रविना (Raveena Tondon) टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 14 एप्रिल रोजी रिलीज होणारा केजीएफ 2 हा भारतातील बहुप्रतिक्षित चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आनंदी आणि उत्साही करण्यासाठी निर्मात्यांनी या आगामी रिलीज चित्रपटातून एक सिंगल रिलीज केले आहे.

केजीएफ 2 चे सुलतान हे गाणे आज रिलीज झाले असून ते ऐकणे खूप मजेदार आहे. या चित्रपटातील आणि चित्रपटातील गाण्यांमध्ये यशच्या मोहिनीने यापूर्वीच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपटाचा हा वेगवान ट्रॅक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरुन दिसुन आले आहे. चित्रपटाची गाणी शब्बीर अहमद यांनी लिहिली आहेत. 14 एप्रिल 2022 ला देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज होणारा, केजीएफ 2 हा प्रशांत नील यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. होंबले फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरगंदूर यांनी याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: संजुबाबानं सांगितली KGF 2 च्या क्लायमॅक्सची गोष्ट, 'कॅन्सरमधून...'

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे हा चित्रपट उत्तर-भारतात सादर केला जात आहे. एक्सेलने दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो आणि गली बॉय सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. काही दिवसांपूर्वी 'केजीएफ २' सिनेमाच्या पोस्टमध्ये अभिनेता यश आणि संजय दत्तसोबत अभिनेत्री रवीना टंडनचा लूक समोर आला होता. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे की या सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर कधी प्रसिद्ध होईल? अशातच यशच्या चाहत्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. '

हेही वाचा: काय सांगता 'अँग्री यंग मॅन'वर आधारित KGF 2? यशनं केला खुलासा

Web Title: Kgf 2 Movie Yash Sultan Song Viral Avtar Netizens Social Media Rocking Star Released Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..