
KGF Chapter 3: निर्मात्याचा 'यु टर्न', आता केली मोठी घोषणा
KGF Chapter 2 Box Office Collection: प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलीवूडला मोठा धक्का दिला आहे. तीन वर्षानंतर केजीएफचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यामध्ये दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता (Tollywood Movie) यशनं मुख्य भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. आतापर्यत या चित्रपटानं 1 हजार 170 कोटींची कमाई केली आहे. केजीएफच्या पहिल्या चित्रपटानं 250 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कोरोनामुळे केजीएफचे प्रदर्शन (Bollywood News) लांबणीवर पडले. निर्मात्यांना केजीएफच्या दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांनी मोठी घोषणा केली होती. ती सोशल मीडियावरुन चर्चेतही आली होती.
चाहत्यांना आता केजीएफच्या तिसऱ्या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. निर्माते विजय यांनी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांसाठी दिलासादायक बातमी दिली होती. त्यानंतर कार्यकारी निर्माता कार्तीक गोडा यांनी मात्र यु टर्न घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत सध्या तरी केजीएफ 3 ची शुटींग सुरु करण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे सांगितले आहे. निर्माता विजय यांनी सांगितले होते की, यावर्षी ऑक्टोबरमध्ये केजीएफच्या तिसऱ्या पार्टच्या शुटींगला सुरुवात होणार आहे. मात्र आता हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: KGF Chapter 2: रॉकीची सातासमुद्रापार कमाल, दक्षिण कोरियात नवीन रेकॉर्ड
कार्तिक गोडा यांनी व्टिट करुन चाहत्यांना जी माहिती दिली आहे त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. कदाचित पुढच्या वर्षी केजीएफचा तिसरा चित्रपट आपल्या भेटीला येईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र गोडा यांच्या सांगण्यानुसार 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांबरोबरच आम्ही देखील नव्या चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहोत. यापूर्वी विजय यांनी सांगितले होते की, तिसऱ्या चित्रपटाची तीस ते चाळीस टक्के शुटींग पूर्ण झाली आहे. आणि याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्या प्रॉडक्शनला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा: Video : KGF आणि पुण्याचं कनेक्शन
Web Title: Kgf 3 Producer Breaking News Now Released The Third Part In 2024 Karthik Gowda Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..