
KGF Chapter 2: रॉकीची सातासमुद्रापार कमाल, दक्षिण कोरियात नवीन रेकॉर्ड
Tollywood News: कन्नड सुपरस्टार यशच्या केजीएफनं (Yash KGF 2) कमाल केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे. केजीएफच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. केवळ भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये यशच्या केजीएफनं नवनवे रेकॉर्ड तयार केले (Bollywood News) आहे. त्यापैकी एक नवीन रेकॉर्ड हा आता दक्षिण कोरियामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटानं बॉलीवूडच्या नाकीनऊ आणले आहेत अशा केजीएफचा प्रभाव अनेकांना धक्का देऊन गेला आहे. (Bollywood Movies) बॉलीवूडनं तर आपले काही महत्वाचे चित्रपट पुढे ढकलेले आहेत. बॉलीवूडमधल्या बड्या स्टार कलावंतांनी त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा आरआरआरनंतर केजीएफच्या दुसऱ्या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिण कोरियामध्ये देखील हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. केजीएफ ही कन्नड भाषेतील पहिली फिल्म आहे जी दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित झाली आहे. यापूर्वी केजीएफ 2 हा सियोलमध्ये देखील रिलिज झाला होता. कोरोनाच्या महामारीनंतर कोरियामध्ये प्रदर्शित होणारा केजीएफ 2 हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत, नेपाळ, बांग्लादेश सारख्यादेशांमध्ये देखील केजीएफचा प्रभाव हा वाढताना दिसतो आहे. त्याला त्या देशांमध्ये प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे.
हेही वाचा: KGF 2: OTT Rights चा आकडा ऐकून व्हाल थक्क, केली प्रचंड कमाई
केजीएफमध्ये रॉकी अर्थात यशनं महत्वाची भूमिका साकारली होती. त्याच्या जोडीला बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त, अभिनेत्री रविना टंडन यांच्याही भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. दक्षिण कोरियामध्ये केजीएफ 2 चे केवळ कन्नडच नाहीतर हिंदी व्हर्जन देखील दाखवण्यात आले. या चित्रपटानं जगभरात तब्बल 1129.38 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. आरआरआर आणि दंगलनंतर बॉक्स ऑफिसवर दंगलनं सर्वाधिक कमाई केली आहे. पाच भाषांमध्ये 14 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले होते.
Web Title: Kgf 2 Movie Create New Record South Korea Yash Rockstar First Kannada Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..