नुसरत भरुचानं चक्क रस्त्यावर विकले Condom; म्हणाली,'जनहित में जारी...' Nushrat Bharuccha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nushrat Bharuccha -'Janhit Mein Jaari'

नुसरत भरुचानं चक्क रस्त्यावर विकले Condom; म्हणाली,'जनहित में जारी...'

बॉलीवूड(Bollywood) अभिनेत्री नुसरत भरूचानं(Nushrat Bharuccha) गेल्या काही दिवसांत आपल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. तिनं आपल्या चाहत्यांच्या मनातही खास स्थान मिळवलं आहे. नुसरतचा काही दिवसांपूर्वी 'छोरी' सिनेमा भेटीस आला होता. हॉरर जॉनरच्या माध्यमातून समाजातील एका महत्त्वाच्या समस्येवर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं होतं. आता नुसरत लवकरच तिच्या आगामी 'जनहित में जारी' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं पोस्टर आणि टिझर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यामध्ये नुसरत कंडोम चा प्रचार-प्रसार करताना दिसत आहे. 'जनहित में जारी' सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

'जनहित में जारी' सिनेमात नुसरत भरुचा सेल्सवुमन(Saleswoman) बनलेली दिसत आहे. सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला नुसरत म्हणतेय,''रात रंगीन,मजे,प्लेजर...हेच सगळं पाहून आपण ४० हून १४० करोड झालो आहोत''. आणि त्यानंतर नुसरत टीझरमध्ये दुकानांपासून रस्त्यावरील प्रत्येकाला कंडोम विकताना दिसत आहे. व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती नुसरतला म्हणतेय,'तिसऱ्या माळ्यापर्यंत चढू शकशील?'. तेव्हा नुसरत म्हणते,''चाचा,आमच्या कंपनीचा कंडोम आहे त्याचा मी प्रचार करतेय''.

व्हिडीओला शेअर करत नुसरतने कॅप्शन लिहीलंय की,''या सेल्सवुमनची स्टोरी आपले विचार बदलेल. 'जनहित में जारी' चा ट्रेलर दोन दिवसात रिलीज होईल. याआधी नुसरतने सिनेमाचा एक पोस्टर शेअर करताना लिहिलं होतं की,''आतापर्यंत तुम्ही मोठमोठे सिनेमे पाहिले असतील. पण आता वेळ आहे या वूमनियाची,जी घेऊन येणार आहे एक मोठी आयडिया. जनहित में जारी सिनेमा १० जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे''.

'जनहित में जारी' सिनेमाचं दिग्दर्शन जय बंटू सिंगने केलं आहे. तर सिनेमाचं कथानक राज शांडिल्यचं आहे. या सिनेमात नुसरत भरूचासोबत पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात विजय राज ही महत्त्वाच्या भूमिकत दिसणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा 'जनहित में जारी' सिनेमा १० जूनला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर नुसरतने हटके अंदाजात याचं प्रमोशनही सुरू केलं आहे.