
केजीएफ फेम यशला तंबाखू ब्रॅन्डची करोडोची ऑफर,अभिनेत्याचं अवाक करणारं उत्तर
काही दिवसांपूर्वी जेव्हा तंबाखू ब्रॅन्डच्या जाहिरातीत बॉलीवूडचे तीन प्रसिद्ध कलाकार दिसले तेव्हा मोठ्या वादाला सुरुवात झालेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. सगळ्यात जास्त वाद रंगला जेव्हा त्या जाहिरातीत अक्षय कुमार(Akshay Kumar)दिसला. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यानंतर त्यानं माफी मागितली आणि जाहिरातीतनं मागे हटण्याचा निर्णयही जाहिर केला. हे वादळ क्षमत नाही तोवर आता बातमी कानावर पडतेय की पान मसाला ब्रॅंडनं केजीएफ २ (KGF Chapter 2)स्टार यशला(Yash) जाहिराती संदर्भात संपर्क साधला आहे. परंतु, कन्नड अभिनेता यशनं ही जाहिरात करण्याला साफ नकार दिला आहे. खास अंदाजात त्यानं नकार कळवला आहे,जे ऐकून त्याचे चाहते मात्र भारावले आहेत.
हेही वाचा: बॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप गायक 'TAZ' चं निधन; हृतिक,जॉनसाठी गायलेली हीट गाणी
सूत्रांच्या माहितीनुसार,यशला पान मसाला ब्रॅन्डनं आपल्या जाहिरातीसाठी करोडो रुपयांची ऑफर दिली होती. पण केजीएफ २ स्टारनं क्षणाचाही विलंब न लावता लगेचच आपला नकार कळवला. यशसाठी जी कपंनी जाहिरातींचं डील करते त्या एक्सीड एन्टरटेन्मेंट कंपनीन या बातमीला कन्फर्म केलं आहे. या कंपनीचे मुख्य अर्जुन बॅनर्जी यांनी एक मीडियासाठी निवेदनपत्र जाहिर केलं आहे. ज्यात लिहिलं आहे,''पान मसाला आणि त्या संबंधित प्रॉडक्टसचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे मृत्यूही होऊ शकतो. यशनं या जाहिरातीला नकार कळवून खऱ्या हिरोसारखं काम केलं आहे. त्याचे चाहते आणि फॉलोअर्ससाठी त्यानं हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे,त्यानं यासाठी करोडो रुपये ठुकरावले'' असंही निवेदन पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा: पलक तिवारीनं आई श्वेता तिवारीच्या वैवाहिक आयुष्यावर केला मोठा खुलासा
त्या निवेदनात असंही म्हटलं आहे की,''आमची समाजात जी छबी आहे त्या माध्यमातून लोकांना चांगलाच मेसेज जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. यश त्याचा वेळ,मेहनत अशा ब्रॅन्डवर खर्चू इच्छितो जिथे समाजाप्रती चांगला संदेश जाईल,आणि जास्तीत जास्त वर्ष ते लोकांच्या फायद्याचं ठरेल,वैचारीक पातळीवर समानता असेल''. तंबाखू ब्रॅन्ड संदर्भातील प्रॉडक्ट्सची जाहिरात न करण्याच्या यशच्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. आता बातमी कानावर पडत आहे की अल्लु अर्जून म्हणजे 'पुष्पा' स्टारनं देखील तंबाखू ब्रॅन्डच्या उत्पादनाची जाहिरात करण्याला नकार कळवला होता.
Web Title: Kgf Chapter 2 Star Yash Say No To Pan Masala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..