
Anant Nag: KGF चा 'हा' प्रसिद्ध अभिनेता आता बनणार नेता! लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश...
Anant Nag: ब्लॉकबस्टर चित्रपट KGF फेम ज्येष्ठ अभिनेते आणि माजी मंत्री अनंत नाग भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत . अनंत नाग बुधवारी संध्याकाळी भाजप कार्यालयात कर्नाटक भाजप अध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.
73 वर्षीय अनंत नाग यांनी 1980 मध्ये जनता पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मिळालेल्या वृत्तानुसार, अनंत नाग यांच्या सदस्यत्वावेळी मंत्री मुनिरत्न, सुधाकर आणि अन्य नेते भाजप कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
अनंत नाग यांच्या राजकिय परिचयाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी जेएच पटेल यांच्या सरकारमध्ये शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. 2004 मध्ये त्यांनी चामराजपेट मतदारसंघातून जेडीएसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष राज्यात सक्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे अनेक बडे नेते राज्यात प्रचार करत आहेत.
अनंत नाग यांच्यावर जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा खूप प्रभाव होता. एका मुलाखतीत त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, अनंत नाग हे 1983, 1985 आणि 1989 मध्ये कर्नाटकात जनता पक्षाचे स्टार प्रचारक होते. 1988 ते 1994 पर्यंत ते एमएलसीही होते. 1994 मध्ये त्यांनी मल्लेश्वरममधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. नंतर त्यांना राज्यमंत्रीही करण्यात आले .
तसेच अनंत नाग यांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झाल्याय त्यांनी साउथ, हिंदी आणि इंग्रजी अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1973 मध्ये 'संकल्प' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अंकुर या हिंदी चित्रपटात काम केले. 2003 मध्ये त्यांनी स्टंबल या इंग्रजी चित्रपटात काम केले होते. याशिवाय ते प्रसिद्ध टीव्ही मालिका मालगुडी डेजमध्येही दिसले होते.