सोहेल,अरबाज खानकडून कोरोना प्रॉटोकॉलचे उल्लंघन 

टीम ईसकाळ
Tuesday, 5 January 2021

सोहेल आणि अरबाज खान यांच्याकडून कोरोनाच्या प्रॉटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. यूएईवरून मुंबईत परतल्यानंतर ते थेट घरी निघून गेले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई -  कलाकारच जेव्हा नियमांना पायदळी तुडवतात तेव्हा चाहत्यांपुढे नेमका कोणता आदर्श उभा राहतो असा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या वेळी काय काळजी घ्यावी आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने काही मार्गदर्शक सुचना जाहिर केल्या आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी काटेकोरपणे नियमांचे पालन केले जात आहे. 

हे वाचा - 'बॉन्ड गर्ल' तान्या रॉबर्ट्सच्या निधनाच्या बातम्या खोट्या, अभिनेत्री आहे जिवंत मात्र प्रकृती गंभीर

सलमान खान याचे दोन भाऊ सोहेल आणि अरबाज खान यांच्याकडून कोरोनाच्या प्रॉटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. यूएईवरून मुंबईत परतल्यानंतर ते थेट घरी निघून गेले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर ते  घरी निघून गेल्यानं खान भाऊ अडचणीत सापडले आहे. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांचे बुकिंग हे हॉटेल ताज लॅण्डमध्ये करण्यात आले होते. त्यानुसार 26 डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथे गेलेच नसल्याचे समोर आले. हे तिघेही परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आता या तिघांना भायखाळाच्या रिचर्डसन अँड क्रूडास येथील क्वारंटाईन सेंटरला सुद्धा नेण्यात येणार आहे. 9 जानेवारीपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

हे ही वाचा: कपिल शर्माने शेअर केली गुडन्युज, ट्विटमागच्या सिक्रेटचा केला खुलासा  

 बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा निर्वाण खान यांच्याविरुद्ध कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही 25 डिसेंबर रोजी युएईवरुन भारतात परतले होते. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर ते थेट घरी निघून गेले.

'कुछ कुछ होता है' फेम छोटा सरदार परझान अडकला विवाहबंधनात, पारसी रितीरिवाजात केलं लग्न

 नव्या कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी ब्रिटन आणि यूएईवरुन आलेल्या प्रवाशांना 14 दिवसांच्या  विलगीकरणात राहावे लागते. त्यानुसार त्यांचे बुकिंग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आले होते. परंतु हे तिघे तिथे गेलेच नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khan brothers violated corona pandemic government norms and regulation