खतरों के खिलाडीची होस्ट फराह खान... 

संतोष भिंगार्डे
Friday, 24 July 2020

या सीझनचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत होणार आहे. पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे शूटिंग भारतात होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करीत होता.

मुंबई:  कलर्स हिंदीवरील खतरों के खिलाडी या कार्यक्रमाला गेली अनेक वर्षे प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत दहा सीझन्स झाले आहेत.
दहावा सीझन बल्गेरियात चित्रित झाला आणि आता नवीन सीझन सुरू होत आहे. त्याचे नाव आहे खतरो के खिलाडी....मेड इन इंडिया.

या सीझनचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत होणार आहे. पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे शूटिंग भारतात होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करीत होता. मात्र रोहित शेट्टी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी हैदराबादला गेला आहे. त्यामुळे पहिल्या दोन भागांचे सूत्रसंचालन दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान करणार आहे. तिसऱ्या एपिसोडपासून फराहच्या जागी पुन्हा रोहित आपल्या भेटीला येईल. या नव्या सीझनमध्ये मागील सीझन्समधील चॅम्पियन्स त्यांचे साहस दाखवीत अंतिम करंडकासाठी लढतील. हा सीझन येत्या १ ऑगस्टपासून कलर्सवर सुरू होणार आहे. 

संपादक- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khatroon Ke Khiladi will be hosted by Farah Khan