जॅकी श्रॉफ व नीना गुप्ता एकत्र 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री नीना गुप्ता पहिल्यांदाच एकत्र आले आहेत; पण एका लघुपटासाठी. जरा विचित्र नाव असलेल्या खुजली लघुपटात हे दोघे अनोख्या अंदाजात दिसणार आहेत. यू-ट्युबवरील टेरिबली टिनी टॉकीज (टीटीटी) या वाहिनीवर हा लघुपट पाहायला मिळेल. हा लघुपट दोन व्यक्तींच्या अव्यक्त इच्छेवर आधारित आहे. जॅकी श्रॉफने सांगितले की, "खुजली' हा हलकाफुलका व मनाला भावणारा लघुपट आहे. मला या लघुपटाची कहाणी व दिग्दर्शक सोनम नायर यांनी पटकथा ऐकवली ती खूप आवडली. टीटीटीच्या टीमसोबत काम करून खूप मजा आली.' 

Web Title: Khujli, Jackie Shroff, Neena Gupta, Jackie Shroff Neena Gupta