कियाराने सिद्धार्थ मल्होत्राबरोबर साजरा केला वाढदिवस, फोटो झाले व्हायरल

कियाराने सिद्धार्थ मल्होत्राबरोबर साजरा केला बर्थ डे
Kiara Advani And Sidharth Malhotra
Kiara Advani And Sidharth Malhotraesakal

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा भले हे आपल्या रिलशनशीपविषयी बोलण्याचे टाळत आहेत. मात्र त्यांचा एकत्र फोटो जेव्हा समोर येतो तेव्हा वास्तव सगळ्यानाच कळते. याबाबतच खर चित्र त्यांचे दुबईतील छायाचित्रांवरुन स्पष्ट होत आहे. कियारा अडवाणीचा आज ३१ जुलै रोजी वाढदिवस आहे. हा खास क्षण साजरा करण्यासाठी दोघेही दुबईत आहेत. (Kiara Advani Celebrates Her Birthday With Sidharth Malhotra In Dubai Photos Goes Viral)

Kiara Advani And Sidharth Malhotra
सलमान खानच्या 'शो'मध्ये कलाकार करणार डान्स, चाहत्यांनाही मिळणार संधी

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) या दोघांबरोबर एका चाहत्याने दुबईच्या माॅल ऑफ एमिरेट्समध्ये छायाचित्रे क्लिक केले आणि ती सोशल मीडियावर शेअर केली. या छायाचित्रातून स्पष्ट होते की कियाराच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी सिद्धार्थ तिच्याबरोबर दुबईत आहे.

Kiara Advani And Sidharth Malhotra
तुम्हीही मोदींवर खूश नाही? विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरचा घेतला तात्पुरता निरोप

सदरील चाहत्याने दोघांबरोबर वेगवेगळे छायाचित्रे काढली आहेत. मात्र ठिकाण एकच आहे. एका छायाचित्रात कियारा भावाबरोबर दिसते, तर दुसऱ्यात तिच्याबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com