Kiara-Sidharth नं लग्नानंतर लगेचच ब्रेक केला आलिया-रणबीरचा 'हा' रेकॉर्डKiara Advani & Sidharth Malhotra Wedding Pics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding Pics most liked instagram post than alia-ranbir wedding pics

Kiara-Sidharth नं लग्नानंतर लगेचच ब्रेक केला आलिया-रणबीरचा 'हा' रेकॉर्ड

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding Pics: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्न नुकतंच थाटात पार पडलं. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत मिस्टर अॅन्ड मिसेस मल्होत्रा च्या रुपात आपली पहिली-वहिली झलक दाखवली आहे.

लोकांना दोघांची जोडी खूपच आवडली आहे. हेच कारण आहे की त्यांच्या फोटोला केवळ दोन दिवसांत १३.५९ मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

माहितीसाठी फक्त इथे नमूद करतो की आतापर्यंत कोणत्याच भारतीयानं पोस्ट केलेल्या पोस्टला इतके लाइक्स मिळाले नव्हते. आतापर्यंत हा रेकॉर्ड आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटो पोस्टच्या नावावर होता.(Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding Pics most liked instagram post than alia-ranbir wedding pics)

आलिया आणि रणबीरनं गेल्याच वर्षी आपल्या बान्द्रा येथील घराच्या बालकणीत काही मोजक्याच आप्तेष्टांच्या आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. आलियानं लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं होतं की,''आज आम्ही आमच्या कुटुंबासोबत आणि मित्र परिवारासोबत..आमच्याच घरी..आणि घरातील सगळ्यात जवळच्या-आवडीच्या जागी..लग्नगाठ बांधली आहे. लव्ह,रणबीर आणि आलिया''.

तिच्या या पोस्टवर आतापर्यंत १३.१९ मिलियन लाइक्स मिळाले आहेत.

कतरिना-विक्की कौशलच्या लग्नांच्या फोटोंना आतापर्यंत इन्स्टाग्रामवर १२.६२ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. कतरिनानं लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं होतं की,''आमच्या मनात त्या सगळ्या गोष्टींप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची भावना आहे,ज्याच्यामुळे आम्ही या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत. आपल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची अपेक्षा आहे''.

दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या फोटोंवर ६.४८ मिलियन लाइक्स तर वरुण धवन-नताशा दलाल यांच्या लग्नाच्या फोटो पोस्टवर ५.७३ मिलियन लाइक्स तर विराट-अनुष्का शर्माच्या लग्नाच्या फोटोंवर ३.४४ मिलियन आणि प्रियंका-निक जोनसच्या लग्नाच्या फोटोंवर ६१ लाख इतके लाइक्स मिळाले आहेत.