अंधश्रद्धाळू कियारा; एखादा सिनेमा साइन करेपर्यंत 'ही' गोष्ट मूळीच करत नाही Kiara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KIara Advani

अंधश्रद्धाळू कियारा; एखादा सिनेमा साइन करेपर्यंत 'ही' गोष्ट मूळीच करत नाही

कियारा अडवाणी(Kiara Advani) म्हणजे सध्याची बॉलीवूडची मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेत्री. ग्लॅमरस,फॅशन दिवा,हॉट,बोल्ड अशी कितीतरी विशेषणं तिच्या नावाआधी लावली जातात. पण मग असं सगळं असताना जेव्हा आपण ऐकू की कियारा अडवाणी अंधश्रद्धाळू आहे तर विश्वास बसेल का तुमचा? कोणाचाच बसणार नाही. पण जर अभिनेत्रीनं स्वतःच तिच्या अंधश्रद्धेविषयी सांगितलं तर नक्कीच ठेवाल न विश्वास. तर मग याविषयी चला जाणून घेऊया सविस्तर. कारण काही दिवसांपूर्वी कियारा आपल्या आगामी 'भूल भूलैय्या २' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेली असताना तिनं याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: शिल्पा शेट्टीचं काय बिनसलं? सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

काही दिवसांपूर्वी कियारा 'द कपिल शर्मा शो' मध्ये भूल भूलैय्या २ च्या टीमसोबत गेली होती. तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन,राजपाल यादव,दिग्दर्शक अनीझ बझ्मी देखील उपस्थित होते. कपिलनं संपूर्ण टीमसोबत खूप मस्ती केली होती. कियारा अडवाणीसोबतही फ्लर्ट करण्याची संधी कपिलनं सोडली नाही. त्यावर कार्तिक आर्यनने देखील कपिलची मस्करी करीत म्हटलं,''तो शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करतो''. त्यानंतर कपिल शर्मानं कियाराला विचारलं की,'' ती अंधश्रद्धाळू आहे का?'' त्यावर कियारा काय म्हणाली ते ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल.

कियारा अडवाणी म्हणाली,''मी पूर्ण अंधश्रद्धाळू मुळीच नाही. हो,पण एका गोष्टीच्या बाबतीत मात्र मी अंधश्रद्धाळू बनते. मी जोपर्यंत एखादा सिनेमा साइन करत नाही तोपर्यंत मी त्याविषयी कोणालाच सांगत नाही''. हे ऐकून सगळे हैराण झाले. पण शो ची जज अर्चना पुराण सिंगने मात्र तिचं यासाठी कौतूक केलं. कियारा पुढे म्हणाली,''मी जर सिनेमा साइन करण्याआधी कोणाला सांगितले तर तो माझ्या हातातून जाईल असं मला उगाचच वाटत राहतं''.

हेही वाचा: Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं?

कपिल शर्मानं शो मध्ये आलेल्या कार्तिक आर्यन(Katik Aaryan)ची मस्करी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यानं कार्तिकला म्हटलं,''तुझी प्रत्येक अभिनेत्रीसोबत इतकी छान केमिस्ट्री कशी जुळते''. पण यावर मिश्किल कार्तिक आर्यनने देखील मजेदार उत्तर देत कपिलवर पलटवार केला आहे. कपिलनं कार्तिकला विचारलं,''तू असं काय सॉफ्टवेअर स्वतःमध्ये बसवून घेतलयस ज्याने प्रत्येक अभिनेत्रीसोबत तुझी जोडी जमून जाते''. त्यावर कार्तिक म्हणाला,''माझं तुझ्यासारखच आहे कपिल. तु देखील शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीसोबत शनिवार,रविवारी एकच डायलॉग बोलतोस,सारखीच कॉम्प्लिमेंट देतोस,मी सुद्धा तेच करतो''. एवढी सगळी धमाल त्या शो मध्ये पहायला मिळणार असली तरी व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे कियाराच्या अंधश्रद्धाळूपणाचीच चर्चा अधिक रंगली आहे.

Web Title: Kiara Advani Superstitious Reveal Truth In Kapil Sharma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top