Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं? Allu Arjun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun- Pushpa 2

Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं?

दाक्षिणात्य सिनेमांनी गेल्या काही दिवसांत आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. यापैकी एक सिनेमा ज्याची जोरदार चर्चा झाली तो म्हणजे 'पुष्पा' (Pushpa). 'पुष्पा' सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर उचलून धरलं होतं. सगळ्यात इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे 'पुष्पा' सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने तगडी कमाई केली होती. आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती 'पुष्पा २' (Pushpa-2)सिनेमा कधी प्रदर्शित होत आहे याविषयी.

हेही वाचा: उर्मिलानं सोडलं कोठारे कुटुंबाचं घर? एकाच इमारतीत वेगळी रहात असल्याची चर्चा

सिनेमाच्या निर्मात्यांनी याआधीच खरंतर सांगितलं आहे कि 'पुष्पा-द रुल'(Pushpa-The Rule) या सिनेमावर काम सुरु आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक अपडेट्स अधनं-मधनं येतच असतात. आता बातमी आहे की 'पुष्पा-द रुल' या सिनेमाचं बजेट ४०० करोड आहे. याव्यतिरिक्त अल्लू अर्जुनच्या फी संबंधित बोलायचं झालं तर या सिनेमासाठी अल्लू अर्जुननं जितकी फी घेतली आहे ती याआधीच्या सिनेमांपेक्षा कैकपटीनं जास्त आहे.

हेही वाचा: शेखर सुमन Movers & Shakers मधून करणार कमबॅक?; पोस्ट करुन दिली Hint

'पुष्पा-द राइज'(Pushpa-The Rise) सुपरहिट झाल्यामुळेच आता 'पुष्पा-द रुल' सिनेमाविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता पहायला मिळत आहे. एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनपसार,'पुष्पा-२' सिनेमाचं बजेट जिथे ४०० करोड आहे तिथे अल्लू अर्जूननं(Allu Arjun) सिनेमासाठी १०० करोड घेतले आहेत. जर असं असेल तर मग अल्लू अर्जुननं या सिनेमासाठी घेतलेली ही सर्वात जास्त फी ठरेल.

हेही वाचा: सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का? अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा

'पुष्पा भाग १' चं बजेट २०० ते २५० करोड इतकं होतं. मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की अल्लूनं या सिनेमासाठी ३५ करोड रुपये फी आकाराली होती. 'पुष्प-द रुल' हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचं शूटिंग सध्या सुरू आहे. पुष्पाचा पहिला भाग म्हणजे 'पुष्पा-द राइज' हा सिनेमा १ डिसेंबर,२०२१ रोजी प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा: 'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड?

'पुष्पा' सिनेमाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की या सिनेमाचा दुसरा भाग देखील डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी बातमी होती की 'केजीएफ २' ला मिळालेल्या यशानंतर 'पुष्पा भाग २' च्या निर्माते-दिग्दर्शकानं 'पुष्पा २' च्या संहितेत बदल करण्याचं ठरवलं आहे. पण त्यानंतर लगेचच यावर स्पष्टिकरण देताना 'पुष्पा २' चे निर्माते वाई रविशंकर यांनी,''आमच्याकडे खूप उत्तम संहिता आहे,जिच्यात बदल करण्याची गरजच नाही'', असं म्हटलं होतं.

Web Title: Pushpa 2 Movie Budget Allu Arjun Fee Read Inside

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top