
शिल्पा शेट्टीचं काय बिनसलं? सोशल मीडियावर केली मोठी घोषणा
बॉलीवूडमध्ये एक काळ शिल्पा शेट्टीनं(Shilpa Shetty) गाजवला आहे. मग ते तिचे सिनेमे असो की त्यापेक्षा अधिक अक्षयसोबत गाजलेलं तिचं प्रेमप्रकरण असो. की अगदी इंटरनॅशनल टेलीव्हिजनच्या 'बिग ब्रदर' या रिअॅलिटी शो मध्ये तिचं जिंकणं असो. तिनं आपला असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षात तर तिनं रिअॅलिटी शो ची परिक्षक म्हणूनही आपलं मोठं नाव केलंय. पण त्याहून अधिक सोशल मीडिया या नवीन माध्यमावर देखील तिनं खूप कमी वेळात आपलं प्रस्थ निर्माण केलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल.
हेही वाचा: Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं?
तिच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही दिवसांत आलेलं वादळ म्हणजे राज कुंद्रा तिचा नवरा पोर्नोग्राफी प्रकरणात अडकला तेव्हा तिनं खूप धीरानं त्याचा सामना केला होता. त्यानंतर शिल्पा-राज मध्ये काही ठीकठाक सुरु नाही अशा बातम्या कानावर पडत होत्याच. पण शिल्पानं नेहमीच आमच्यात सगळं आलबेल असं नेहमीच दाखवलं .असो, या सगळ्या मागच्या गोष्टी सांगण्याचं एवढंच कारण की नुकतीच एक मोठी घोषणा सोशल मीडियावर तिनं केली आहे. ती म्हणाली आहे,''आता कंटाळा आला....'' चला जाणून घेऊया सविस्तर नेमकं काय म्हणालीय शिल्पा तिच्या या पोस्टमधनं.
हेही वाचा: उर्मिलानं सोडलं कोठारे कुटुंबाचं घर? एकाच इमारतीत वेगळी रहात असल्याची चर्चा
शिल्पा शेट्टीला आपण नेहमीच सोशल मीडियावर धमाल करताना पाहिलं आहे. कधी तिचे ग्लॅमरस फोटो ती शेअर करुन चाहत्यांना भुरळ घालताना दिसली आहे तर कधी तिच्या फनी व्हिडीओमधूनही तिनं चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या फिटनेस व्हिडीओचे तर लाखो फॅन्स सोशल मीडियावर आहेत. खाण्या-पिण्याच्या बाबतीत तिनं दिलेले सल्ले,किंवा तिच्या मोटिवेशनल व्हिडीओला फॉलो करणारेही अनेक...मग असं सगळं असताना शिल्पा शेट्टी का बरं म्हणाली,''मला कंटाळा आलाय तेच तेच करुन,सगळं सारखंच,मी आता सोशल मीडियापासून ब्रेक घेतेय,परत तेव्हाच येईन जेव्हा मी काहीतरी नाविन्याचा शोध लागलेला पाहीन''. शिल्पा शेट्टीनं ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर सोशल मीडियापासून आपण ब्रेक घेतल्याचं जाहिर केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच शिल्पानं सोशल मीडियावर एक प्रेरणा देणारी पोस्ट लिहिली होती. ती म्हणाली होती,''आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की कसे आपण अद्वितीय,अद्भूत आहोत. मग आपणही नकळत एखाद्या दुसऱ्या यशस्वी व्यक्तिमत्त्वाचं अनुकरण करायला जातो. पण त्यावेळेला आपण लक्षात घ्यायला हवं की,कधीच कुणी परफेक्ट नसतं. सगळ्यांमध्ये काही चांगले,काही वाईट गुण असतात. आपण सगळेच आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांच्या आधारावरच प्रगती करु शकतो,तर चला आपण आपल्याला अधिक चांगलं बनवूया,आपल्यात जे वाईट गुण आहेत ते नियंत्रणात कसे राहतील याकडे अधिक लक्ष देऊया. आपण आपल्यातील जे सर्वोत्कृष्ट आहे नेहमी त्याची निवड करूया''. आता यापुढे शिल्पाचे चाहते किती दिवस तिच्या अशा प्रेरणादायी विचारांना मुकणार हे सांगणं कठीण. तेव्हा लवकरच शिल्पाला ज्या नाविन्याची भूक आहे त्याचा शोध लागो अन् ती पुन्हा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी सक्रिय होवो ही सदिच्छा.
Web Title: Shilpa Shetty Big Announcement On Social
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..