Kiara Advani : माझ्या हातची पाणीपुरी खाल्ली, सिद्धार्थची आई 'सासूबाई'च झाली!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे.
Kiara Advani
Kiara Advaniesakal
Updated on

Kiara advani impressed sidharth malhotra mom : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांचे लग्न ही त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी खूपच चर्चेची बाब होती. त्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटोही नेटकऱ्यांच्या कमेंटसचा विषय होता. आता कियारानं आपल्या सासूबाईंना कशाप्रकारे इंप्रेस केलं होतं. याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

सिद्धार्थविषयी सांगताना कियारानं म्हटलं की, आता माझं लग्न झालं आहे. आमचा प्रेमविवाह झाला. त्यामुळे यात कित्येक गोष्टींबाबत तुम्हाला समजावून घ्यावे लागते.तुम्ही प्रत्येकवेळी एकाच गोष्टीसाठी हट्ट करुन चालत नाही. तुमच्यापैकी कुणा एकाला का होईना मोठं व्हावं लागतं. ते कुणी व्हायचं हे ठरवायचं. त्यात जर नेमकेपणा नसला तर मग कुरबूर होते. आमच्यात तसं नाही. जे काही त्यात संवाद आहे. म्हणून आनंद आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

मला खऱ्या प्रेमावर विश्वास आहे. त्याच्याप्रती आदर आहे. सिद्धार्थ खूपच समजूतदार आहे. दोन व्यक्ती मिळून घर तयार होते. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि मी खूपच नशीबवान आहे की मला सिद्धार्थ सारखा मुलगा मिळाला. आम्ही एकमेकांची निवड केली आहे. माझा पती हा माझा सगळ्यात चांगला मित्र पण आहे. त्यामुळे आम्ही आणखी एकमेकांच्या विचारांचा आदर करु लागतो. एकमेकांप्रती विश्वास आहे. त्याचं घर हे मला सासर वाटत नाही त्यामागे प्रेम हेच कारण असावं.

मिर्ची प्लसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कियारानं सांगितलं की, माझ्या सासूबाईंना पाणीपुरी खूपच आवडते. सिद्धार्थनं मला याविषयी सांगितलं होतं. कियाराची सासू रिम्मा मल्होत्रा यांना इंप्रेस करण्यासाठी पाणीपुरीचा जो प्रयोग केला होता तो कमालीचा यशस्वी झाला होता. त्यांना कियारानं केलेली पाणीपुरी खूपच आवडली होती. आणि त्यांनी कियाराला होकार दिला होता. सिद्धार्थ तू आता याच मुलीशी लग्न करायचं असं त्यांनी सांगून टाकलं होतं.

Kiara Advani
Shah Rukh Khan : राजकुमार हिरानीच्या चित्रपटात यापूर्वी शाहरुख का नव्हता?

कियाराच्या त्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा आहे. कियारा ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. आता कियाराच्या आगामी वर्क प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यसास तिचा नुकताच कार्तिक आर्यनसोबत सत्यप्रेम की कथा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com