Kiara-Sidharth Wedding: संगीत सोहळ्यात भाव खाऊन गेला कियाराचा भाऊ..मिशाल अडवाणीच्या परफॉर्मन्सची रंगली चर्चा

कियारा अडवाणीचा भाऊ मिशाल अडवाणीनं आपल्या इन्स्टाग्राम हॅंंडलवर संगीत सोहळ्यातील आपल्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Kiara Advani's Brother mishaal Advani perform in sister's wedding
Kiara Advani's Brother mishaal Advani perform in sister's weddingInstagram

Kiara-Sidharth Wedding: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानं लग्नसोहळ्याआधी राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. अद्याप लग्नाआधी पार पडलेल्या सोहळ्यांचे फोटो समोर आलेले नाहीत. पण कियाराचा भाऊ मिशाल अडवाणीनं मात्र संगीत सोहळ्याच्या रात्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मिशालनं बहिण कियारा आणि जीजाजी सिद्धार्थ मल्होत्रासाठी एक परफॉर्मन्स दिला होता. त्यानं त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे,जो वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये मिशाल एक गाणं परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानं मनीष मल्होत्रानं डिझाईन केलेला ब्लॅक कलरचा आऊटफिट परिधान केला आहे.

व्हिडीओत संगीत सोहळ्यातील सजावटीची एक झलकही दिसत आहे. पण यात कियारा आणि सिद्धार्थ मात्र कुठे दिसत नाहीयत.(Kiara Advani's Brother mishaal Advani perform in sister's wedding)

Kiara Advani's Brother mishaal Advani perform in sister's wedding
Rubina Dilaik: 'तू तर राखी सावंत दिसतेयस..', सुजलेल्या चेहऱ्याच्या रुबिनाला पाहून यूजर्सच्या भन्नाट कमेंट्स

व्हिडीओ शेअर करत मिशालनं कियारा आणि जीजाजी सिद्धार्थला तो टॅग केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''तेरी ऑंखो से याद आया मेरी बातों में प्यार''. यावर रिअॅक्ट होताना कियारानं कमेंट सेक्शनमध्ये इमोजी पोस्ट केले आहेत.

त्यानंतर कियाराची मैत्रिण अनीसा मल्होत्रा जैननं लिहिलं आहे की,'मिशाल तुझा परफॉर्मन्स एकदम किलर परफॉर्मन्स होता'. तर एका चाहत्यानं विनंती केली आहे की,'सिडकियाराची क्लीप देखील शेअर करा'.

सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न अगदी जवळचेच कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत पार पडलं. या लग्नात करण जोहर, मीरा राजपूत,शाहिद कपूर,अमृतापाल सिंग बिंद्रा,तान्या घावरी,जुही चावला सारखे सेलिब्रिटी सामिल झाले होते.

Kiara Advani's Brother mishaal Advani perform in sister's wedding
Kiara-Sidharth नं लग्नानंतर लगेचच ब्रेक केला आलिया-रणबीरचा 'हा' रेकॉर्ड

पहिल्या दिवशी करणनं मित्रपरिवारासोबत लग्नाचे काही फोटो शेअर करत लिहिलं की,''हम साथ साथ है...#सिडकियाराकिशादी..यारों की शादी..सिड और कियाराला खूप खूप आशीर्वाद आणि हे सगळंच एकदम जादूई तसंच अद्भूत आहे''.

''मनिष मल्होत्राचे देखील खूप खूप आभार..त्यानं ना केवळ कियारा-सिद्धार्थला सुंदर दिसण्यासाठी चांगले कपडे डिझाईन केले..तर त्यानं माझ्यासाठी देखील छान पोषाख तयार केला यासाठी मी त्याला धन्यवाद देईन. मनीष यू आर द बेस्ट..लव्ह यू..''

लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थ आपले इतर नातेवाईक तसंच मित्रपरिवारासाठी लग्नाचं रीसेप्श देण्यासाठी दिल्लीला पोहोचले .तिथले देखील त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.

तसंच, १२ फेब्रुवारीला मुंबईच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीत फिल्म इंडस्ट्रीतील बडे-बडे सेलिब सामिल होणार असल्याचं कळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com