Kili Paul : किलीचं बोलणं भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर ऐकतच राहिले!

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पॉल किली नावाच्या व्यक्तीनं स्वताची वेगळी ओळख तयार केली आहे.
Kili Paul Video
Kili Paul Video esakal

Kili Paul meet Foreign Minister Dr S Jayshankar : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पॉल किली नावाच्या व्यक्तीनं स्वताची वेगळी ओळख तयार केली आहे. तो आता लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युंअर्स झाला आहे. तो आणि त्याची बहिण या दोघांनी मिळून भारतीय सोशल मीडिया युझर्सला आपल्या कलेनं वेडं केलं आहे.

सध्या किली बहिण भाऊ यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री जय शंकर यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यानं त्यांच्याशी संवादही साधला आहे. त्यात तो म्हणतो मला तीन ते चार भाषा येतात. मी भारतातील वेगवेगळ्या गोष्टींचा खूप चाहता आहे. त्यापासून प्रेरणा घेतली आहे. पॉल किलीनं आतापर्यत बॉलीवूडच्या चित्रपटातील संवाद, गाणी यावर रिल्स शेयर केले आहेत. एवढेच नाहीतर त्यानं मराठी चित्रपटातील गाण्यांवर देखील रिल्स तयार करुन नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलच्या गदर २ चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. तब्बल दोन दशकानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनिल शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सोशल मीडियावर गदर २ चा ट्रेलर व्हायरल झाला आहे. गाणीही व्हायरल झाली आहेत. अशातच वेगवेगळ्या सोशल मीडिया इन्फ्ल्युंअर्सला देखील त्या गाण्यांची भुरळ पडली आहे. हे सगळं पॉल किली बहिण भावंडापर्यत पोहचल्याचे दिसून आले.

Kili Paul Video
Gadar 2 Song : 'मैं निकला गड्डी लेके...' गदरच्या गाण्यावर 'किली ब्रदर'चा डान्स!

पॉल किली आणि त्याच्या बहिणीनं मिळून सनी देओलच्या मैं निकला गड्डी लेके या गाण्यावर रिल्स शेयर केले असून त्याला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कित्येकांनी पॉलचे प्रचंड कौतूक केले आहे. पॉलला बॉलीवूडच्या गाण्यांची असलेली समज आणि त्यावर त्यानं केलेला डान्स हे कॉम्बिनेशन नेटकऱ्यांना भलतेच आवडले आहेत.

Kili Paul Video
Kajol News : 'तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त…'; ठाकरे गटाकडून काजोलची पाठराखण

दुसरीकडे पॉल किलीनं भारताचे विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर यांची घेतलेली भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटही भन्नाट आहे. किली आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तू टाझांनियाचा असूनही सगळ्यांना जिंकून घेतले आहेस. याबद्दल तुझे अभिनंदन. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी पॉलचे कौतूक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com