Killer Soup Review : मनोज अन् कोंकणानं 'किलर सूप'ची लज्जत आणखी वाढवलीय! कडक अन् बिनधास्त अंदाज

स्वर्गवासी झालेल्या त्या व्यक्तीच्या दशक्रियेची तयारी सुरु आहे. आचारी जेवण तयार करण्याच्या गडबडीत आहे.
Killer Soup Review
Killer Soup Review esakal

Killer Soup review manoj bajpayee : स्वर्गवासी झालेल्या त्या व्यक्तीच्या दशक्रियेची तयारी सुरु आहे. आचारी जेवण तयार करण्याच्या गडबडीत आहे. त्यावेळी कॅमेरा आपल्याला काही वेगळं सांगू पाहतो. आपल्याला त्या फ्रेम्समधील साईन अन् सिम्बॉल समजले की आणखी गंमत येते. दिग्दर्शक चौबे वेगळं काही सांगू पाहणारा दिग्दर्शक आहे हे किलर सूपमधून दिसून येते. वरवर वाटणारी ही कथा इतकी साधेपणानं पुढे सरकणारी नाही. हेही कळते.

त्या कार्पेटवर रक्त पसरले आहे. तो खून नेमका कुणी आणि का केला आहे हे कळायला मार्ग नाही. त्यात प्रभाकर शेट्टी (मनोज वाजपेयी) आणि स्वाती (कोंकणा सेन शर्मा) यांनी त्यांचं अर्ध आयुष्य मोठ्या संघर्षात व्यतीत केलं आहे. अशावेळी त्यांच्या समोर आलेली ती परिस्थिती भलतीच गंभीर असल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी त्यांना काय करावे कळत नाही.थोड्याशा हटक्या स्वभावाच्या त्या कपल्सच्या हातून तर काही घडले नाही ना अशी शंका तुम्हाला येणं स्वाभाविक आहे, पण....

तुम्ही किलर सूपमध्ये जे काही पाहत आहात ते दिसतं तितकं सोपं आणि साधं नाही. आठ एपिसोडच्या किलर सूपमध्ये तुम्हाला प्रत्येक भागात दिग्दर्शक चकवा देतो. विचार करण्यास भाग पाडतो. किलर सूपचे दोन भाग होतात तोच तुमच्या समोर वेगळ्या गोष्टी समोर येतात. अभिषेक चौबे यानं किलर सूपमध्ये कमाल केली आहे. त्यामुळेच की काय ही सीरिज तुमच्या मनाचा ताबा घेऊ लागते.

तमिळ, मल्याळम, हिंदी, आणि इंग्रजी भाषेमध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्याचा फ्लेवर हा तुम्हाला मोहात पाडणारा आहे. त्यामुळेच की काय आगामी काळात त्याचा दुसरा सीझनही येतो की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. अभिनय, कथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सगळ्याच बाबतीत किलर सूपनं बाजी मारल्याचे दिसते.

ही मालिका तुम्हाला दोन मोलाच्या गोष्टीही सांगून जाते. काहीवेळेला तुमच्या जवळचं सत्य तुम्हाला सांगायचे असेल तर विनोदाचा आधार घ्यावा लागतो. किंवा आणखी वेगळ्या प्रकारे ती गोष्ट तुम्हाला सांगावी लागते.तसचं काहीसं किलर सूपच्या बाबत म्हणता येईल. तिथे डार्क विनोज आहे, कॉमेडीही आहे. त्यामुळे तुम्हाला जे पटेल ते घ्या आणि तुमची मनोरंजनाची भूक भागवा, असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे.

दिग्दर्शक अभिषेक चौबे हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या कलाकृतींसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. यापूर्वीच्या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये उल्लेख करायचा झाल्यास सोनचिडिया, उडता पंजाब, रे, इश्किया, या चित्रपटांची नावं घ्यावी लागतील. या दिग्दर्शकानं नेहमीच त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारचे मनोरंजन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला आहे.

किलर सूप पाहिल्यावर तो काहीवेळेला थोडासा बोजड वाटू लागतो. पण थोडा वेळ सहन केल्यावर चौबेनं जे मनोरंजन केले आहे त्याला तोड नाही असेही जाणवते. त्यातील संवाद, छायाचित्रण आणि संगीत भारीच आहे. त्यामुळे किलर सूपमधील कथानक हे लक्ष वेधून घेताना दिसते. आपण त्यात गुंगून जातो. बऱ्याचदा त्यात काही गोष्टी अतिरेकीपणानं मांडण्याचाही प्रयत्न केला आहे तो वेगळा वाटू शकतो.

Killer Soup Review
Inspirational Story: आयआयटीची तयारी, मग BA, आणि आता...; गोष्ट संकटाने न खचलेल्या एका विद्यार्थ्याची!

मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा, सयाजी शिंदे यांच्या भूमिका या प्रभावी आहेत. त्यांनी त्यांची भूमिका चोखपणे बजावल्याचे दिसते. त्यामुळेच की काय कथानक काही वेळेला रटाळवाणं वाटत असताना त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपण किलर सूप पाहू लागतो. हे त्या कलाकारांचे यश आहे असे म्हणावे लागेल.

---------------------------------------------------------------------------------

कलाकार - मनोज वाजपेयी, कोंकणा सेन शर्मा, नासर, सयाजी शिंदे

दिग्दर्शक - अभिषेक चौबे

रेटिंग - ३ स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com