किंग खानकडून मदतीचा ओघ सुरूच! 'त्या' चिमुकल्याच्या मदतीसाठी घेतला पुढाकार

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 3 June 2020

शाहरूख आणि त्याची मीर फाउंडेशनने  मुजफ्फरपूरमधल्या व्हायरल व्हिडिओतल्या 'त्या' चिमुकल्याच्या मदतीसाठी घेतला पुढाकार घेतला आहे.

मुंबई ः कोरोनामुळे उद्वभवलेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी अनेक कलाकार पुढे आलेले आहेत. बाॅलीवूडचा किंग खान शाहरूखनेदेखील मदतीचा हात दिला आहे. स्वतःचे ऑफिस त्याने कोरोनाग्रस्तांसाठी सरकारला दिले आहे आणि आणखीनही खूप सारी मदत त्याने केली आहे. शाहरुख खान या कठीण काळात देशातील गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. नुकत्याच, कोलकता येथील अम्फान चक्रीवादळाने प्रभावित क्षेत्रात तो आपली पत्नी गौरी खान आणि टीम कोलकाता नाइट राइडर्ससोबत लोकांच्या मदतीसाठी पुढे आला. आता किंग खानने आणखीन एक महत्वाचे कार्य केले आहे. शाहरूख आणि त्याची मीर फाउंडेशनने  मुजफ्फरपूरमधल्या व्हायरल व्हिडिओतल्या 'त्या' चिमुकल्याच्या मदतीसाठी घेतला पुढाकार घेतला आहे.

Cyclone Nisarga: मुंबई महापालिकेनं 'या' ठिकाणी
केली राहण्याची सोय..

सध्या अनेक मजूर जीवघेणा प्रवास करीत आपाल्या गावाकडे निघालेले आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील तो अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आणि सगळ्यांचे मन हेलावले. अरविना खातुन नामक 35 वर्षीय महिला प्लेटफॉर्मवर मृत अवस्थेत आढळून आली. ही दुर्दैवी महिला तिच्या दोन छोट्या मुलांसोबत 25 मे रोजी अहमदाबादहून श्रमिक स्पेशल ट्रेनने मुझफ्फरपुर रेल्वेस्थानकात आली होती. या रेल्वेस्थानकावर ब्लॅँकेटनं झाकलेला तिचा मृतदेह आणि तिला उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहानग्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या मीर फाउंडेशनने या मुलाच्या मदतीसाठी आणि त्याच्या आर्थिक साहाय्यासाठी आपला पुढाकार जाहीर केला. मीर फाउंडेशनच्या ट्टिवटर अकाऊंटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली असून 'व्हिडिओमध्ये आईला उठवणाऱ्या या चिमुकल्यापर्यंत पोहचवण्यास मदत केल्याबद्दल आभार, आम्ही त्याची जबाबदारी घेतोय, तो सध्या त्याच्या आजी-आजोबांजवळ सुरक्षित आहे' असं त्यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: King Khan continues to help! He took the initiative to help 'that' Chimukalya