किंग खान करणार दोन नायिकांबरोबर रोमान्स 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

आनंद एल. राय यांच्या चित्रपटात किंग ऑफ रोमान्स एका नाही तर दोन दोन नायिकांबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. पण त्यानंतर शाहरूखच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं. या चित्रपटात शाहरूख बुटक्‍याची भूमिका करत आहे. पण तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की ह्या दोन नायिका कोण; ज्यांच्याबरोबर शाहरूख रोमान्स करताना दिसणार आहे? तर बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका आणि बार्बी गर्ल कतरिना यांच्याबरोबर शाहरूख रोमान्स करताना दिसणार आहे. शाहरूखने याआधी या दोघींबरोबर वेगवेगळे चित्रपट केले आहेत.

आनंद एल. राय यांच्या चित्रपटात किंग ऑफ रोमान्स एका नाही तर दोन दोन नायिकांबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी हा चित्रपट सलमान खान करणार होता. पण त्यानंतर शाहरूखच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं. या चित्रपटात शाहरूख बुटक्‍याची भूमिका करत आहे. पण तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की ह्या दोन नायिका कोण; ज्यांच्याबरोबर शाहरूख रोमान्स करताना दिसणार आहे? तर बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका आणि बार्बी गर्ल कतरिना यांच्याबरोबर शाहरूख रोमान्स करताना दिसणार आहे. शाहरूखने याआधी या दोघींबरोबर वेगवेगळे चित्रपट केले आहेत. दीपिकाबरोबर "ओम शांती ओम', "हॅप्पी न्यू इयर'; तर कतरिनाबरोबर "जब तक है जान' हे चित्रपट केले आहेत. पण ह्या दोघी आता शाहरूखबरोबर एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. आनंद एल. राय यांनी पहिल्यांदा आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांना घेण्याचा विचार केला होता. पण या दोघींची नावे समोर आली. शाहरूख आणि या दोघींची केमिस्ट्री प्रथमच प्रेक्षकांना एकत्र बघायला मिळणार आहे. शाहरूखचा प्रेमळ अंदाज या दोघींसोबत कसा खुलतो याचीही उत्सुकता आहेच...  
 

Web Title: king khan romance with 2 actress