शाहरुखचा हवेत जबरदस्त स्टंट, व्हिडिओ व्हायरल, हजारो लाईक्स 

king khan shah rukh khan amazing stunts in air video viral on social media
king khan shah rukh khan amazing stunts in air video viral on social media

मुंबई - किंग खान अशी ओळख म्हणून जगभरात प्रसिध्द असलेला शाहरुख त्याच्या नवीन चित्रपटाच्या तयारीसाठी जोरदार मेहनत घेत आहे. त्याचा एक स्टंट नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं असं काही केलं आहे की त्याच्या फॅन्सनं त्या पोस्टला मोठ्या संख्येनं लाईक केलं आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किंग खान सध्या त्याच्या आगामी पठाण नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून त्यात त्याचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जीरो नावाच्या चित्रपटानंतर शाहरुख मोठया ब्रेकनंतर पडद्यावर दिसणार आहे. तो चित्रपट फारसा यश मिळवू शकला नाही. शाहरुखला आता पठाणकडून जास्त अपेक्षा आहेत. त्या चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडिओ त्यानं शेयर केले आहेत. तो सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्यात शाहरुखचा हवेतील जबरदस्त स्टंट कौतूकाचा विषय आहे. दुबईतील एका इमारतीवरील हा स्टंट आहे. असे सांगितले जात आहे. शाहरुखच्या रेड चिली कंपनीच्या वतीने तो व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर फॅन्सनं कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये कॅज्युएल ड्रेसमध्ये हवेत स्टंट करताना दिसत आहे. अशाप्रकारची स्टंटबाजी करण्याचा शाहरुखचा पहिलाच प्रयत्न असेल असे बोलले जात आहे. त्याच्या फॅन्सनंही त्याचा असा व्हिडीओ यापूर्वी पाहिला नसेल.

आयपीएल नंतर शाहरुखनं त्याच्या पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली होती. त्यात तो कमालीचा व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी ओम शांती ओम, चैन्नई एक्सप्रेस, हॅप्पी न्यू ईयर सारख्या चित्रपटात काम केले होते.  या दोघांचा एकत्रित हा 4 था चित्रपट आहे. शाहरुखनं त्याच्या इंस्टावर शेयर केलेल्या त्या व्हिडिओला काही तासांत 20 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. काही जण असे म्हणत आहेत की, हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटाचा आहे की जाहिरातीचा हे कळण्यास मार्ग नाही.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख आणि दीपिकानं त्यांच्या पहिल्या शेड्युल्डचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com