शाहरुखच बॉलिवूडचा 'किंग'; मानधनात अक्षय-सलमानला टाकलं मागे

king khan shahrukh khan charge 100 crore as fees for film pathan became highest paid actor
king khan shahrukh khan charge 100 crore as fees for film pathan became highest paid actor
Updated on

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळख असलेल्या शाहरुखच्या पठाण चित्रपटाची मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरु आहे. शाहरुखचा सिनेमा म्हटल्यावर त्याची प्रचंड क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. यावेळी मोठ्या काळानंतर त्याचा सिनेमा प्रेक्षकांसमोर येत असल्याने त्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. यापूर्वीही शाहरुखननं त्याविषयी माहिती दिली होती. सध्या शाहरुखननं या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. त्यात त्यानं भाईजान आणि मिस्टर परफ्केशनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमीरलाही मानधनाच्या बाबत मागे टाकलं आहे. शाहरुखनं घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकल्यास तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या पठाणची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील फाईट सीन्सही लीक झाले होते. तेव्हापासून शाहरुखच्या या चित्रपटाविषयी कुजबूज चालु झाली आहे. आता तर शाहरुखनं पठाणसाठी घेतलेल्या मानधनावरुनही चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटासाठी शाहरुखनं एवढी फी आकारली आहे की त्यामुळे ब़ॉलीवूडमधील सर्वात मानधन घेणारा कलावंत झाला आहे. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी पठाणच्या नावानं सोशल मीडियावर फॅन क्लब तयार केले आहेत. त्याच्यावर पठाणचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

व्टिटरवर पठाण या चित्रपटाविषयी असा दावा करण्यात आला आहे की, शाहरुखनं या चित्रपटासाठी 100 कोटी घेतले आहे. त्यामुळे आता तो सर्वाधिक मानधन घेणारा भारतातील अभिनेता ठरला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, शाहरुखनं अक्षय कुमार आणि सलमान खान यांना मागे सोडले आहे. मात्र आपण किती मानधन घेतलं यावर शाहरुखनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जी माहिती आहे त्याबाबत शंका आहे. मात्र या चित्रपटासाठी शाहरुखनं प्रचंड मेहनत घेतली आहे. असे सांगितले जाते की, त्यानं या चित्रपटासाठी बुर्ज खलिफावर एक अॅक्शन सीन शुट केला आहे.

या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि ज़ॉन अब्राहम यांची भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच त्यात सलमान खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पठाणची शुटिंग ही मुंबई, दुबई आणि परदेशातील अन्य काही ठिकाणी झाली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com