esakal | आर्यनसाठी घरात वेगळे नियम, मन्नत मध्ये राहतो कडक शिस्तीत
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यनसाठी घरात वेगळे नियम, मन्नत मध्ये राहतो कडक शिस्तीत

आर्यनसाठी घरात वेगळे नियम, मन्नत मध्ये राहतो कडक शिस्तीत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भलेही एका मुलाखतीमध्ये शाहरुखनं आपल्या मुलाविषयी त्यानं करायला पाहिजे अशी यादी दिली होती. प्रत्यक्षात त्याच्या घरात त्याच्यावर फार बंधनं आहेत असेही त्यानं सांगितल्याची माहिती समोर आली आहे. ती देखील शाहरुखनं एका मुलाखतीमध्ये दिली होती. आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. काल त्याच्यावर एनसीबीनं कारवाई केली. सोशल मीडियावर तो सध्या ट्रेडिंगचा विषय आहे. अद्याप काही सेलिब्रेटी सोडल्यास त्याच्या मुलावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुनील शेट्टी, पूजा भट्ट, सलमान खान यांनी शाहरुखला सपोर्ट केल्याचे दिसून आले आहे. काल मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी हा फक्त आणि फक्त पैशांचा माज असल्याचे सांगितलं होतं. ट्रोलर्सनंही शाहरुख आणि आर्यनला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे.

वास्तविक बॉलीवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन हे जूनं आहे. यापूर्वी देखील त्यात काही स्टार अडकले आहेत. त्यात नावं सांगायची झाल्यास दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, एजाज खान, रकुल प्रीत सिंग, रिया चक्रवर्ती ही ती नावं आहेत. त्यांना एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. सारा अली खानचं ही त्यात नाव होतं. आता त्यात शाहरुखच्या मुलाचं आर्यन खानचं नाव आलं आहे. एनसीबीनं मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझवर छापा टाकला आणि त्यांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यात आर्यनसह आणखी काही बडया हस्तींचाही समावेश आहे. आता असं म्हटलं जातंय की, शाहरुखचा मुलगा त्यात फसण्याची शक्यता आहे.

तुम्हाला कदाचित हे ऐकुन धक्का बसेल पण शाहरुखनं आर्यनला घरात मोठ्या धाकात वाढवलं आहे. याबद्दल त्यानंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, माझ्या मुलाला मी घरात शर्टलेस फिरु देत नाही. मला ते आवडतही नाही. त्याल घरात तसं फिरण्यास मी मनाई केली आहे. यावेळी त्यानं आपण आर्यनवर जे संस्कार करतो आहोत त्याची मोठी यादी सांगितली होती. 2017 मध्ये शाहरुखनं फेमिनाला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यानं सांगितलं होतं की, मी महिलांना फार सन्मान देतो. त्यांचा आदर करतो. आणि मी आर्यनलाही तिच शिकवण दिली आहे. त्यामुळे मी त्याला घरात शर्टलेस फिरण्यास मनाई केली आहे. त्याला नेहमी महिलांचा आदर करण्यास सांगितलं आहे.

मी माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो. घरात आई, वडिल, बहिण असतात त्यांच्या समोर आपण कसं बसलं पाहिजे, ड्रेसिंग सेन्स कसा असावा याबद्दल मी काटेकोर आहे. माझ्य़ा मुलानं देखील तसं असावं हा माझा आग्रह आहे. त्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही. कारण ते मॅनर्स आहेत. संस्कार आहेत. समाजात आपली ओळख ही आपल्या संस्कारानं होते हे आपण लक्षात ठेवायला हवे. असेही शाहरुखनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. एखादी मुलगी ज्या पद्धतीन घरात वागू शकणार नाही त्यावर एका मुलानं देखील नियमांचे पालन केले पाहिजे. अशी भूमिका शाहरुखची होती.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खान चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज

loading image
go to top