Jawan: 'जवान'मध्ये शाहरुखचा डबलरोल..या दिग्गज अभिनेत्याच्या चित्रपटापासुन असेल प्रेरित...

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान 'पठाण' चित्रपटाच्या यशानंतर सतत चर्चेत असतो.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khansakal

बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खान 'पठाण' चित्रपटाच्या यशानंतर सतत चर्चेत असतो. या अभिनेत्याने तब्बल चार वर्षांनी पडद्यावर शानदार पुनरागमन केले आहे. जेव्हापासून शाहरुखने त्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हापासून हा अभिनेता चर्चेत आहे. त्यांचा हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित करणार आहे.

लेटेस्ट अपडेटनुसार, किंग खानचा हा चित्रपट कमल हासनच्या 'ओरु कैदीयिन डायरी' या चित्रपटापासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 'जवान' भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 1986 मध्ये आलेला चित्रपट 'आखिरी रास्ता' आणि कमल हासनचा चित्रपट 'ओरू कदीयिन डायरी' यांच्यापासून प्रेरित आहे. या दोन्ही कलाकारांनी वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिका साकारल्या होत्या.

Shah Rukh Khan
Rishi Kapoor: 'प्रत्येक चांगल्या आठवणीत...', ऋषी कपूर यांच्या स्मृतीदिनानिमित्त नीतू कपूर भावुक, पोस्ट व्हायरल

रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की 'बादशाह' त्याच्या आगामी चित्रपटात पिता आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये समान संघर्षाचे मुद्दे आहेत. दिग्दर्शक अॅटली हे कमल हासनचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना ८० च्या दशकातील हिट चित्रपटाला स्वतःचे ट्विस्ट आणि ट्रीटमेंट द्यायची होती.

Shah Rukh Khan
Alka Yagnik: अलका याज्ञिकने रागाच्या भरात आमिरला रुममधुन लावलं होतं हाकलून...

मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचवेळी, 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुन शाहरुखच्या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com