अनुपम खेर यांच्या वैवाहिक आयुष्यात 'या' व्यक्तीमुळे खळबळ Anupam Kher | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher,Kiran Kher

अनुपम खेर यांच्या वैवाहिक आयुष्यात 'या' व्यक्तीमुळे खळबळ

अनुपम खेर(Anupam Kher) यांनी किरण खेर(Kiran Kher) यांच्याशी लग्न केलं ते साल १९८५ मध्ये. ते अनुपम खेर यांचं पहिलं लग्न असलं तरी किरण खेर या घटस्फोटित होत्या आणि त्यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांना सिकंदर हा मुलगा होता. पण अनुपम खेर यांनी किरण खेर यांच्या मुलाचाही मनापासून तेव्हा स्विकार केला होता. इतकंच नाही तर किरण खेर यांच्या मुलाला त्यांनी आपलं नाव दिलं होतं,जो मुलगा आज अभिनेता सिकंदर खान म्हणून ओळखला जातो. अनुपम खेर अनेकदा आपल्या कुटुंबासोबत नेहमीच वेळ घालवताना दिसतात. ते सोशल मीडियावरही आपल्या कुटुंबासोबतचे फोटो-व्हिडीओ पोस्ट करीत असतात.

हेही वाचा: करिना-सैफच्या नात्यात असं काय बिघडलं की तिनं भावूक पोस्ट टाकलीय...

काही दिवसांपूर्वी तर जेव्हा किरण खेर कॅन्सरशी झगडत होत्या तेव्हा अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरनं लोकांना किरण खेर यांच्यासाठी प्रार्थना करायचं आव्हान केलं होतं. त्या शेअर केलेल्या व्हिडीओत अनुपम खेर भावूक झालेलेही दिसत होते. आज किरण खेर सोनी टि.व्ही वरील 'इंडियाज गॉट टॅलेन्ट' या शोचं परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर अनुपम खेरही आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. पण मग नेमकं असं काय घडलं की अनुपम खेर यांनी एक ट्वीट केलंय ज्यात त्यांनी म्हटलंय,''एका क्षणी किरण मला म्हणाली होती, तू दुसरं लग्न का करीत नाहीस?'' तर हे ट्वीट अनुपम यांनी त्यांचे जिगरी दोस्त अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलं होतं बरं का. नेमकं किरण खेर असं का म्हणाल्या,अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या ट्वीटशी याचा काय संबंध असे प्रश्न तुमच्या मनात प़डले असतीलच. तर सांगतो आम्ही नेमकं काय कनेक्शन आहे ते.

तर अनुपम खेर आणि अनिल कपूर हे जिगरी दोस्त. केवळ पडद्यावरचे नाही तर पडद्यामागचेही. म्हणजे 'रील आणि रीअल' दोन्हीकडे मित्र म्हणून या दोघांची केमिस्ट्री उत्तम जुळून आलीय. ते एकत्र पार्ट्या करतात,अनेकदा फोन करून भेटतात,छोट्या-मोठ्या सगळ्या प्रसंगात एकमेकांसोबत असतात हे स्वतः या दोघांनी अनेकदा सांगितले आहे. तर अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनुपम खेर यांनी त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट काही दिवसांपूर्वी केलं होती. ज्यात त्यांनी म्हटलं होतं,''तुझ्यामुळे किरण माझ्यावर नेहमी चिडते. मी सारखा तुझ्यासोबत तरी असतो किंवा तुझ्याशी फोनवर बोलत तरी असतो. ती म्हणतेय की. 'मग मी तुझ्याशी लग्न का करीत नाही'....तू माझा खास आहेस,राहशील,वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि जगातलं सगळं सुख तुला लाभो''. तर किरण खेर अनुपम खेर यांना अनिल कपूरशी लग्न कर असं सांगत आहेत बरं का. चुकीचा अर्थ काढू नये. सगळ आलबेल आहे 'मि अॅन्ड मिसेस.खेर' यांच्यामध्ये.

Web Title: Kiran Kher Asked Anupam Kherwhy Dont You Marry Again Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top