करिना-सैफच्या नात्यात असं काय बिघडलं की तिनं भावूक पोस्ट टाकलीय...Kareena Kapoor-Khan post viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kareena kapoor-Khan,Saif Ali Khan

करिना-सैफच्या नात्यात असं काय बिघडलं की तिनं भावूक पोस्ट टाकलीय...

सैफ अली खानचं करिना कपूरसोबत(Kareena Kapoor) हे दुसरं लग्न असलं तरी त्यांच्याकडे पाहिलं की वाटायचं 'मेड फॉर इच अदर' असं हे बॉलीवूडचं स्टायलिश जोडपं. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर म्हणे करीना खूप कोलमडली होती. पण तेव्हा 'टशन' सिनेमाच्या निमित्तानं तिच्या आयुष्यात सैफ अली खानची(Saif Ali Khan) एन्ट्री झाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. या सगळ्याला साक्षीदार होता तो अभिनेता अक्षय कुमार. ब-याच मुलाखतीतून करिना आणि अक्षयनं याविषयी सांगितलं होतं. पुढे एकमेकांना जवळ-जवळ पाच एक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. करिनाची बहिण करिष्मा,आई बबिता सुरुवातीला लग्नासाठी तयार नव्हते पण करिनानं सैफशीच लग्न करायचं मनाशी पक्क केलं होतं आणि करून दाखवलं. मग काय सैफनंही आपल्या मातोश्रींना थोडंसं नाराज करीत करिनाशी मनापासून लग्नाचा निर्णय घेतला होता. २०१२ मध्ये छान नवाबी स्टाईलमध्ये दोघांचं लग्न पार पडलं होतं.

हेही वाचा: ''तिला पाहिलं की माझ्या शिट्टया ठरलेल्या''-प्रशांत दामले

आता तर दोघांना तैमूर आणि जहांगिर ही छान गोंडस मुलं आहेत. दोघांचा छान संसार सुरू होता. बरं सैफनं लग्नानंतरही करिनाला सिनेमात काम करण्यापासनं थांबवलं नाही. करिना नवाब कुटुंबाची सून असूनही त्यानं तिला कधीच कुठल्या बंधनात जखडून ठेवलं नाही. बिनधास्त करिना ही लग्नानंतरही तितकंच बिनधास्त आयुष्य जगतेय. काल-परवापर्यंत दोघांमध्ये सगळं आलबेल असताना अचानक करिनानं सोशल मीडियावर केलेल्या तिच्या पोस्टमध्ये असं का म्हटलं की,'' सैफ मला सोडून हॉटेलमध्ये राहतोय''. असं नेमंक काय घडलं दोघांमध्ये की ही वेळ सैफवर आली.

हेही वाचा: ''होय,आमचं ब्रेकअप झालं आहे''-सुश्मिता सेन

करिना-सैफच्या सुखी संसारात हा मिठाचा ख़डा कोणी टाकला असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना नक्कीच पडला असेल. तर चिंता नसावी,दोघांच्या नात्यात सारं आलबेल आहे. आणि करिनानं त्या पोस्टमध्ये जे म्हटलंय ते सगळं कोरोनामुळे जी परिस्थिती त्यांच्या कुटुंबावर ओढवली होती त्याविषयी म्हटलं आहे. करिना काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. तेव्हा ती घरी क्वारंटाईन होती पण शुटिंग सोडून तिच्यासाठी मुंबईत परत आलेल्या सैफला मात्र हॉटेलमध्ये रहावे लागले होते. कारण करिना-सैफ जिथे राहतात ती इमारत सील करण्यात आली होती. करिनानं आपले रीपोर्ट दोन दिवसांपूर्वी निगेटीव्ह आल्यानंतर काल ती पोस्ट टाकली आहे. ज्यात तिनं सैफचे आभार मानताना त्याला हॉटेलमध्ये रहावे लागले याबद्दल त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. तर पोस्टविषयी आता खरं कळल्यानंतर दोघांच्या फॅन्ससाठी ही खुशखबर आहे की करिना-सैफ अजूनही एकत्र सुखाने नांदत आहेत.

Web Title: Kareena Kapoor Reveals Saif Ali Khan Stayed At Hotel Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..