Kiran Mane: दसऱ्याच्या मुहुर्तावर किरण मानेंना भेटले तृतीयपंथी लोकं; म्हणाले, "माझा द्वेष करणाऱ्यांना..."

किरण मानेंनी तृतीयपंथीय फॅन्सना भेटण्याचा खास अनुभव शेअर केलाय
kiran mane meet transgender fans in the occasion of dasara 2023
kiran mane meet transgender fans in the occasion of dasara 2023SAKAL

किरण माने हे बिग बॉस मराठी 4 मधलं चर्चेतलं नाव. वयाची पन्नाशी ओलांडल्यावरही बिग बॉसमध्ये तरुणांच्या खांद्याला खांदा लावुन माने भिडले. आणि त्यांनी टॉप ५ मध्ये मजल मारली.

किरण माने सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्याचे अपडेट्स शेअर करत असतात. अशातच किरण मानेंनी दसऱ्याला त्यांना भेटायला आलेल्या तृतीयपंथीयांबद्दल खास पोस्ट शेअर केलीय.

kiran mane meet transgender fans in the occasion of dasara 2023
Gautami Deshpande - Virajas Kulkarni: गौतमी देशपांडे - विराजस कुलकर्णी पुन्हा एकत्र, दसऱ्याच्या मुहुर्तावर घोषणा

किरण मानेंनी सोशल मीडियावर तृतीयपंथीय लोकांसोबतचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय, "...आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला !

काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, "किरणजी,तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबाॅसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही...." ऐकताना माझे डोळे पाणावत होते.

किरण माने पुढे लिहीतात, "खास माझ्यासाठी खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला."आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल... सुपरस्टार व्हाल. जगात नांव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत." असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले..."

kiran mane meet transgender fans in the occasion of dasara 2023
Rupali Bhosle: "आणि माझे डोळे पाणावले" रुपाली भोसलेला विमानप्रवास करताना आला विलक्षण अनुभव

किरण माने शेवटी लिहीतात, "बाकी कायबी असो भावांनो, ही अशी माया लै कमीजणांना लाभते. फॅन्सच्या 'लाईव्ह' प्रेमाबाबतीत मी लै लै म्हंजे लैच भाग्यवान हाय ! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत... पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही... कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन..जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़ॆ है !लब्यू"

किरण माने अलीकडेच सिंधूताई माझी माई या मालिकेत झळकले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com