Kiran Mane: तुझे बाबा काय करतात?.. लेकीसाठी किरण माने यांची भावूक पोस्ट..

पहाडासारखे किरण माने लेकीसाठी मात्र हळवे झाले..
Kiran Mane shared emotional post for daughter Eesha Mane on her birthday
Kiran Mane shared emotional post for daughter Eesha Mane on her birthday sakal

kiran mane post on daughter eesha mane: प्रत्येक बापासाठी आपली लेक ही एखाद्या मौल्यवाद दगिन्याहूनही जास्त मोलाची असते. जगापुढे कितीही पहाडासारखा असणारा माणूस लेकीपूढे मात्र हळवा होतो. असाच प्रसंग आज किरण माने यांच्या आयुष्यात आला आहे. आज त्यांच्या लेकीचा म्हणजे ईशा किरण मानेचा वाढदिवस..

या निमित्ताने किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. एरव्ही राजकीय, सामाजिक विश्वावर सडेतोड भाष्य करणारे किरण माने या वेळी मात्रा भावूक झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाही त्यांना त्यांची लेक भेटायला आयी तेव्हा बाप-लेकीच्या नात्यातील गोडवा साऱ्यांनीच पाहिला.

आता त्यांच्या पोस्टने सर्वांचे वेधले आहे. लेकीच्या जन्मानंतर आयुष्यात काय बदल घडला हे त्यांनी अगदी मोजक्या शब्दात सांगितले आहे.

(Kiran Mane shared emotional post for daughter Eesha Mane on her birthday)

किरण माने लिहितात, ''तो दिवस अजून आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता-जाता हाॅस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली... गोड हसली माझ्याकडं बघून... मनात विचार आला ही मोठी झाल्यावर "तुझे बाबा काय करतात?" या प्रश्नाचं काय उत्तर देईल?''

''म्हणेल,"ते दुकानदार आहेत. ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात." माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला ! म्हन्लं नाय नाय नाय नाय... मला ही ओळख नको. माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात 'अभिनय' आहे. कितीही संकटं येऊदेत. काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे "माझे बाबा ॲक्टर आहेत."

''अस्वस्थ झालो... सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली... स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती... विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला...खण्ण्णकन. मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं. कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती.''

हेही वाचा: Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढे किरण माने लिहितात.. ''दुकानात येऊन बसलो. मनात तेच विचार... मला अभिनेता म्हणून जगायचंय... ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला... त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली : 'पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा'... तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय.''

पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये...

''...तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना, "माजे बाबा ॲक्टल आहेत."...तेव्हा लै लै लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा.''

''...आज तिला बघितलं की लोक म्हणतात, "ही ईशा, ॲक्टर किरण मानेंची मुलगी." ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय... पण मी जेव्हा-जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो.''

'वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा... तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस... तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो... खूप आनंदी रहा, हसतमुख रहा... तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू.- तुझा बाबा'' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com