Kiran Mane: नंतर आपण कंगाल होणार आहोत.. असं का म्हणाले किरण माने..

किरण माने यांची पोस्ट होतेय व्हायरल..
Kiran Mane shared post about village old people and their gossiping and mobile addicted new generation
Kiran Mane shared post about village old people and their gossiping and mobile addicted new generationsakal

Kiran Mane: माणसाची परिस्थिती कधी बदलेल काही सांगता येत नाही. पण प्रत्येक परिस्थितीत माणसाला माणसांची गरज असते.. पूर्वी गावखेड्यात माणसं एकमेकांना जोडलेली होती. पण आज ते सगळं उरलेलं नाही.

मोबाइल आणि इंटरनेटच्या जगात आपण माणसांपासून दूर गेलो आहोत. पण आजही ग्रामीण भागात लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यात आनंदी असतात. अशाच गप्पांमध्ये अभिनेते किरण माने सहभागी झाले होते.

पण यावेळी त्यांना काही अनुभव आला, काही जाणवलं.. जर परिस्थिती बदलली तर आपण कंगाल होऊ अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याच संदर्भातील एक पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.

(Kiran Mane shared post about village old people and their gossiping and mobile addicted new generation)

Kiran Mane shared post about village old people and their gossiping and mobile addicted new generation
Irrfan Khan: त्याला जावून आज तीन वर्षे झाली, पण दुःख एकच की इरफानची 'ती' इच्छा पूर्ण होऊ शकली नाही..

किरण माने यांनी शेयर केलेल्या पोस्ट मध्ये ते गावाकडे झाडाच्या पारावार निवांत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या सोबत गावातील वयस्कर मंडळी मस्त गप्पा मारत बसली आहेत. सोबत किरण माने यांनी एक छान कॅप्शन दिलं आहे.

ते म्हणतात, ''...ह्यो माझा लै आवडता छंद ! गावाकडच्या पारावर बसलेल्या जुन्या खोडास्नी बोलतं करून ऐकत र्‍हायचं. दुनियेभरचं ग्यान मिळतं. गांवातले सिसिटीव्ही कॅमेरेच. गांवात कायबी घडूदे. कुठल्याबी घटनेटी ग्राऊंड रिॲलिटी हितं पारावर कळते. नादखुळा भन्नाट गप्पांची जी मैफल इथं जमून येते त्यातली मज्जा ऑनलाईन मिटींग आनि चॅटिंगची सवय लागलेल्या आपल्या पिढीला कळनार नाय.''

पुढे ते म्हणतात, ''समृद्ध जगण्याला मोबाईलनं न गिळलेली ही शेवटची पिढी ! प्रत्येक गांवात अशी मोजकी जुनी खोडं शिल्लक हायत... जाताना जगण्यातलं लाखमोलाचं असं लै कायतरी सोबत घिवून जानारेत... नंतर आपन खर्‍या अर्थानं पोरके आनि कंगाल होनार आहोत !''

''...इस रास्ते में जब कोई साया न पाएगा,
ये बुढा सा आख़िरी पेड बहुत याद आएगा !'' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे. बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com