Kiran Mane: किरण माने यांनी सांगितला बिग बॉसच्या घरातील 'एप्रिल फूल' चा भन्नाट किस्सा..

आज एप्रिल फूल रोजी किरण माने यांची पोस्ट चर्चेत..
Kiran Mane shared post about bigg boss marathi 4 april fool incidence
Kiran Mane shared post about bigg boss marathi 4 april fool incidencesakal

Kiran Mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी बिग बॉसच्या खेळाची आठवण करून दिली आहे. त्याचे निमित्त ही तसेच खास आहे.

( Kiran Mane shared post about bigg boss marathi 4 april fool incidence)

Kiran Mane shared post about bigg boss marathi 4 april fool incidence
Bhau Kadam Birthday: अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली होती भाऊ कदमकडे पाठ.. पण आज..

आज एक एप्रिल.. आजचा दिवस जगभरात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक जन आपल्याला वेड्यात काढतात किंवा मूर्ख बनवतात. थोडक्यात की तर आपली फजिती करून घेण्याचा हा दिवस असतो. एखाद्या गोष्टीला आपण खूप गांभीर्याने घेतो पण वास्तवात ती गोष्ट झालेलीच नसते, आणि आपण फसतो. त्याच एप्रिल फूल म्हणतात.

असाच एप्रिल फूल बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात बिग बॉसने स्पर्धकांसोबत केला होता. आणि निमित्त होतं ते किरण माने.

किरण माने यांचे घरातील अनेकांशी खुपण खटके उडत होते. त्यामुळे किरण माने यांना सातत्याने नॉमिनेट केलं जायचं. आणि एक दिवस अचानक किरण माने घराबाहेर पडले. किरण माने घरातून गेले याचा अनेकांना आनंद झाला. पण बिग बॉसने त्यांना एका खासगी खोलीत ठेवून वेगळाच गेम केला. जेव्हा किरण माने पुन्हा घरात आले तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. आणि सगळ्यांचाच एप्रिल फूल झाला होता. हाच किस्सा किरणने सांगितला आहे.

किरण माने म्हणतात, ''भन्नाट 'एप्रिल फूल' ! 'बिगबाॅस'मधल्या सदस्यांना एकहाती धोबीपछाड देणारे हे नादखुळा 'एप्रिल फूल' ! अपूर्वा,अक्षय,स्नेहलता,देशमुख वगैरे गॅंगला वाटत होते मी एलिमिनेट झालोय, घरी बसलो असेन. जेव्हा विकास म्हणाला की "राणी मुंगी म्हणजे दाद्या असेल" तेव्हा सगळे त्याची टर उडवत त्याच्यावर हसत होते. तेजू,प्रसाद वगैरेंना अंदाज होता "डाॅन कभी भी वापस आ सकता है." मी आल्यावर विक्या म्हणालावता,"दाद्या, आप तो मास्टरमाईंड हो. गेमचेंजर. आप को कैसे निकाल सकते है लोग?'' असा हा किस्सा किरण माने यांनी सांगितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com