Kiran Mane: त्या बहिष्कृत कुटुंबासाठी.. हात जोडत किरण माने यांनी केलं मदतीचं आवाहन..

किरण माने यांची ही पोस्ट वाचाच..
Kiran Mane shared post for medical help to social worker vivek tamaichikar brother akshay tamaychikar heart transplant surgery
Kiran Mane shared post for medical help to social worker vivek tamaichikar brother akshay tamaychikar heart transplant surgerysakal

kiran mane post viral: मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. पण आज त्यांच्या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आज आपल्या चाहत्यांपुढे मदतीचा हात मागितला आहे. एका वंचित समाजातील, बहिष्कृत कुटुंबातील मुलासाठी त्यांनी हा सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे.

(Kiran Mane shared post for medical help to social worker vivek tamaichikar brother akshay tamaychikar heart transplant surgery)

किरण माने म्हणतात, 'मी माझ्या बायकोची कौमार्य तपासणी करणार नाही. असली अनिष्ट परंपरा मी नाकारतो." असं ठामपणे सांगत त्यानं स्वत:च्या समाजाशी संघर्षाला सुरूवात केली. पहिल्या रात्रीच नवविवाहित तरूणीचं कौमार्य तपासण्याच्या घृणास्पद परंपरेला विवेक तमाईचीकर या तरूणानं तडा लावला... समाजानं वाळीत टाकलं, तरी स्त्रीत्वाचा व होणाऱ्या बायकोचा सन्मान राखला.. एक प्रकारची सामाजिक क्रांतीच केली.''

''..समाजातल्या अनेक कुप्रथा बंद व्हाव्यात असं लै जणांना वाटतं, पण स्वत:च्या घरातनं त्या बदलाला सुरूवात करणारा विवेकसारखा जिगरबाज लाखात एक असतो. त्याचं कुटूंबही त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. त्यांच्या समाजानं आज हे कुटूंब बहिष्कृत केलं आहे.''

''आज त्याच विवेकवर आणि तमाईचीकर कुटूंबावर अतिशय कठीण प्रसंग आला आहे. विवेक तमाईचीकरचा अठ्ठावीस वर्षांचा तरणाताठा भाऊ अक्षय हृदयरोगामुळे हाॅस्पीटलाईज्ड आहे. कोविडकाळात त्याला तीन हार्टॲटॅक येऊन गेले. त्याचं हृदय फक्त १५% कार्यरत असल्यामुळं डॉक्टरांनी त्याला 'हार्ट ट्रान्सप्लांट' करायला सांगितलंय.''

''अक्षय पोलिटिकल सायन्स मधून पदवीधर आहे आणि पब्लिक पॉलिसी मध्ये एम.ए. पूर्ण केलंय. तोसुद्धा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. हार्ट ट्रान्सप्लांट नंतर अक्षय अगदी नॉर्मल आयुष्य जगू शकतो. शस्त्रक्रियेचा खर्च २१ लाख आहे आणि त्यापुढे शस्त्रक्रियेनंतर लागणारा खर्च खूप मोठा आहे''

''बहिष्कृत तमाईचीकर कुटुंबियांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे. त्यांना आपली साथ हवी आहे. आपण जमेल त्या क्षमतेने त्याला मदत करूया. किमान ही पोस्ट शेअर करून दानशूर व्यक्तींपर्यन्त हे पोहोचायला द्यायला मदत करूया.''

Account Number:- 37850694213
Name:- Vivek Tamaichikar
Bank Name:- State Bank of India
IFSC No:-SBIN0016846 (Read as SBIN ZERO ZERO ONE SIX EIGHT FOUR SIX)

किंवा

GPay/Phone Pay: 8693055959

उपचारांच्या आणि मदतीच्या माहितीची लिंक कमेन्ट बाॅक्समध्ये देत आहे. - किरण माने.

अशी पोस्ट करत यांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com