Kiran Mane: त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला.. किरण मानेंच्या आजीनं दिला होता खास सल्ला..

किरण माने यांनी सांगितला आजीच्या आठवणीत खास किस्सा..
kiran mane shares emotional post on grandmother and memory of ashok saraf and nilu phule
kiran mane shares emotional post on grandmother and memory of ashok saraf and nilu phulesakal

kiran mane: किरण माने म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चेतलं नाव. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे माने सातत्याने काहीना काही पोस्ट करत असतात.

मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत. असे असले तरी त्यांची नाळ असूनही आपल्या गावाशी, मातीशी, माणसांशी घट्ट जोडली आहे.

याच माणसांमधील एक खास माणूस म्हणजे किरण माने यांची आज्जी.. म्हणजेच आईची आई.. याच आज्जी विषयी आज किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(kiran mane shares emotional post on grandmother and memory of ashok saraf and nilu phule)

kiran mane shares emotional post on grandmother and memory of ashok saraf and nilu phule
Reema Lagoo: बॉलीवुडच्या 'आई'चा आज वाढदिवस.. मृत्यूपूर्वी एक तास अगोदर केलं होतं शुटींग..

किरण माने यांनी या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ''किरन, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो...तस्ली संगत लै वंगाळ." ...सातार्‍यातल्या माझ्या घरी निळू फुले येऊन गेले हे कळाल्यावर आजी घाबरून म्हन्लीवती. तिला वाटलं आपला नातू बिघडला ! तिला सिनेमातलं सगळं खरं वाटायचं. कितीही समजाऊन सांगीतलं तरी पटायचं नाही तिला...'


'आजीला आम्ही 'काकी' म्हणायचो. आईची आई. लै लै लै माया केली तिनं माझ्यावर. सगळ्याच नातवंडांवर तिचा जीव होता. ल्हानपणी सुट्टीत आजोळला, बारामतीजवळ कोर्‍हाळ्याला जाताना मला एकच ओढ असायची ती म्हणजे तिच्या हातचा शिरा ! "माज्या किरन्याला गरा आवाडतो बया" म्हणत खास माझ्यासाठी वेगळा शिरा करायची.'

'लै लाड करायची. भल्या पहाटे अंगणात बंब तापवून घंघाळ्यात गरम पाणी काढून आम्हाला अंघोळ घालण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यन्त तिला अखंड राबताना पहायचो... रात्री मात्र गुडूप झोपेपर्यन्त आमच्याशी गप्पा मारत बसायची. जुन्या आठवणी सांगायची.'

kiran mane shares emotional post on grandmother and memory of ashok saraf and nilu phule
Subhedar Teaser: तयार राहा.. येतायत स्वराज्याचे 'सुभेदार'.. ट्रेलर पाहून रक्त उसळेल..

पुढे किरण माने लिहितात की, 'आमची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर परत निघताना मामा बैलगाडी तयार करायचे. गोनपाटात भात्यान भरून त्याची गादी टाकून, बैलं जुंपायचे. थोपटे वस्तीपास्नं स्टँडवर जायला बैलगाडी निघाली की काकींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा सुरू व्हायच्या. आमच्याकडे बघत डोळे पुसत ती गाडीमागं लांब-लांबपर्यन्त चालत यायची. आम्ही 'टाटा' करत हात हलवायचो. गाडी दिसेनाशी होईपर्यन्त आमच्याकडे बघत बसायची...'


'सगळ्या सुना आणि नातसुनांशी काकींची घनिष्ट मैत्री होती ! एवढेच नव्हे तर शेजारपाजारच्या सुना आणि सासवांबरोबरही तिचे गुळपीठ होते. सगळीकडे काकी 'लोकप्रिय'.'


'बालपण आणि तरुणपण लै लै लै कष्टात आणि हलाखीत गेलं पण त्याची जर्राही खंत तिने कधी बोलून दाखवली नाही. बख्खळ आयुष्य लाभलं तिला. नातवंडांची मुलंबी तिच्या मांडीवर खेळली!'


'जवळजवळ नऊ वर्ष झाली. मी मुंबईत होतो. नाटकाचे सलग प्रयोग लागले होते. प्रयोगाला जातानाच फोन आला 'काकी गेल्या'... मेंदू बधिर झाला. अस्वस्थ झालो. काकींचं अंत्यदर्शनही घेता येणार नाही या जाणीवेनं ढसाढसा रडलो. एकटाच.'

'त्यानंतर साताठ दिवसांनी गेलो.सतत उत्साहानं सळसळणारं माझं आजोळ पहिल्यांदा एवढं उदास आणि भकास पाहिलं मी. सगळं होतं पण माझी काकी नव्हती ! खरंतर माणूस गेल्यावर महिनाभर तरी घरात गोडधोड करत नाहीत पण मामींनी माझ्यासाठी शिरा केला.म्हणाल्या "लाडका नातू आलाय. 'गरा' केला नाही तर काकींना बरं वाटंल का?" ...डोळे भरुन आले. गळा दाटून आला. घास घशाखाली उतरेना.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com