रॅपर बादशहा विरोधातअभिनेत्री किरण खेर करणार तक्रार

'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवरचा वाद....जाणून घ्या नेमकं काय घडलं
Kirron Kher,Badshah
Kirron Kher,BadshahGoogle

बॉलीवूडमध्ये किंवा टी.व्ही इंडस्ट्रीतही कलाकारांमध्ये वाद रंगतात ते अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरनं. कधी कुणाचा इगो दुखावला म्हणून कुणी रुसतं,तर कधी कुणी दुसरा कलाकार सेटवर उशिरा आला म्हणून नाक फुगवून बसतं,कधी कुणाला मनासारखा कॉशच्युम मिळाला नाही म्हणून मन खट्टू होतं तर कधी कुणी स्क्रीप्ट वेळेत मिळालं नाही म्हणून रागावतं. पण त्यातल्या त्यात सगळ्या स्टार मध्ये वाद रंगतात ते ब-याचदा इगोमुळेच. तेव्हा कुणीच कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसतं. त्यात जर वाट जो पहातोय तो वयाने आणि अनुभवाने सीनियर असेल आणि जो वाट पहायला लावतोय तो ज्युनियर तर मग झालीच काशी म्हणायची त्या ज्युनियरची. अशीच वाट लावलीय ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांनी रॅपर बादशहाची तेही रंगबिरंगी 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर. शिल्पा शेट्टीनं हसत-हसत मध्यस्थी केली म्हणून सावरलं सगळं पण तरीही किरण खेर यांनी बादशहाला भरायचा तो दम भरलाच.

Kirron Kher,Badshah
''शाहिदच काय त्याच्या साध्या फोनवरही माझंच राज्य,कोई शक!''

आता नेमकं काय झालं किरण खेर आणि बादशहा यांच्यात थोडक्यात प्रसंग जाणून घेऊया. त्याचं झालं असं की,'इंडियाज गॉट टॅलेंट' या सोनी टि.व्ही वरील कार्यक्रमात किरण खेर,बादशहा आणि शिल्पा शेट्टी हे परिक्षक म्हणून काम पाहतायत. किरण खेर मोठ्या आजारपणातनं ब-या होऊन आल्या आहेत आणि काम करायला सज्ज झाल्यात. तर सेटवर शिल्पा शेट्टी आणि किरण खेर स्त्रीया असूनही वेळेत तयार होऊन आल्या पण शोचं शुटिंग खोळंबून राहिलं ते रॅपर बादशहामुळं. कारण आपले बादशहासाहेब जवळ-जवळ २० मिनिटं सेटवर उशिरा पोहोचले. बरं किरण खेर शांत बसलेल्या पण शिल्पा शेट्टीनं काडी लावली आणि बादशहाविरोधात किरण खेरना चिडवून दिलं. तितक्यात बादशहा आला तेव्हा किरण खेर म्हणतात कशा,''तुझ्या डोक्यावर चार केस, तयार व्हायला असा कितीसा वेळ लागणार तुला. थांब आता तुझ्या आईकडेच मी तुझी तक्रार करते. त्या असं म्हणाल्याआणि सेटवर एकच हशा पिकला.

हा मजेदार व्हिडीओ शिल्पा शेट्टीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ज्यावर फॅन्सनी धम्माल प्रतिक्रिया दिल्यात. दिग्दर्शक-निर्माती फराह खाननेही या प्रतिक्रिया देताना म्हटलंय,'I LOVVVV KIRAN ❤️'. तर अशाप्रकारे उशिरा आल्यामुळे किरण खेरनी बादशहाचा चांगलाच क्लास घेतलाय. भले त्या हसत-हसत हे सगळं बोलत आहेत पण त्यातूनही त्या बादशहाला वेळेत सेटवर पोहोचण्याचे धडे देताना दिसत आहेत. रॅपर बादशहाची काही दिवसांपूर्वी पैसे देऊन म्युझिक अल्बमला फेक व्हयूज मिळवण्यासाठी पोलिसांत तक्रार झाली होती. सध्या ह्या प्रकरणाची चर्चा थांबली असली तरी आता किरण राव यांच्या बादशहा विरोधातल्या या मजेशीर तक्रारीची चर्चा मात्र रंगणार हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com