किरण खेर झाल्या बाळ, तर मुलगा झाला आई.. पाहावाच असा व्हिडीओ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirron kher and sikandar kher

किरण खेर झाल्या बाळ, तर मुलगा झाला आई.. पाहावाच असा व्हिडीओ..

Entertainment news : द काश्मीर फाईल्स (the kashmir files) या चित्रपटानंतर अनुपम खेर (anupam kher) बरेच चर्चेत आले. त्यांच्या अभिनयाविषयी आणि काश्मिरी पंडितांना दिलेल्या पाठिंब्याविषयी त्यांचे कौतुक झाले. केवळ काश्मीर फाईल्सच नव्हे तर अनेक चित्रपट आणि भूमिका त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. पण सध्या त्यांच्या पत्नीवर म्हणजे किरण खेर (kirron kher ) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आई मुलाच्या नात्यातील हा संवाद आहे.

हेही वाचा: अपघातानंतर मलायकाने प्रियकरासोबत घरामध्ये..

अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांची पत्नी किरण खेर आणि मुलगा सिकंदर खेर (sikandar kher) यांच्यातील निरागस संवाद आहे. या व्हिडिओमध्ये किरण खेर सिकंदरच्या म्हणेज आपल्या मुलाच्या मांडीवर बसलेल्या दिसत आहेत.

हेही वाचा: Oscars 2022 : कानशिलात लगावणं विल स्मिथच्या अंगाशी, नेटफ्लिक्सनेही घेतला मोठा निर्णय

या व्हिडीओला अनुपम खेर यांनी सुंदर कॅप्शन दिले आहे, 'मा की ममता और प्रेम की लहरें' असे ते लिहितात. या व्हिडिओतील संवादही अत्यंत लोभस आहे. किरण खेर सिकंदरच्या मांडीवर निवांत बसल्या आहेत आणि त्यांच्या मुलाने त्यांना दोन्ही हाताने घट्टमिठी घातली आहे. त्यावर अनुपम खेर विचारतात, 'गोदी में क्यूं बैठे हो' (तू त्याच्या मांडीवर का बसली आहेस). त्यावर किरण खेर म्हणतात, 'मैं इसकी गोदी में इसलीये बैठी हूं, क्यूंकी मेने इसे जिंदगी भर अपनी गोदी में बैठाया है. इसलीए अब इसे भी मुझे अपनी गोदी में बिठाना चाहिये,'(त्याने मला जपायला हवं कारण आयुष्यभर मी त्याला जपलं आहे)

त्यानंतर अनुपम खेर आपला मुलगा सिकंदरला विचारतात की, आई मांडीवर बसल्याने तुला कसं वाटतंय? त्यावर सिकंदर उत्तर देतो, 'बोहोत अच्छा लग रहा है,' (मलाही खूप चांगलं वाटतयं) यावर अनुपम म्हणतात, 'मुझे भी अच्छा लगा रहा है ये दृश्य देख के. लव्ह की लेहरें.'(तुम्हांला पाहून मलाही खूप बरं वाटतंय. या आई मुलातील प्रेमाच्या लाटा आहेत)

हेही वाचा: चंद्रमुखीच्या तेजाने filmfare magazin लखाखतंय.. अमृता ठरली पहिली मराठी अभिनेत्री..

या व्हिडीओवर चात्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. आई मुलाचे प्रेम पाहून अनेकजण भारावले आहेत. किरण या स्वतः दिग्गज अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शो मध्ये परीक्षक पदी आहे. त्यांची बोलण्याची अनोखी शैली, मिश्किल स्वभाव प्रेक्षकांना भावातो. त्यांच्या या व्हिडिओनंतर त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम अधिकच वाढले असून ही व्हिडीओ वेगाने पसरत आहे.

Web Title: Kirron Kher Sits On Son Sikander Khers Lap In Cute Video Anupam Kher Dubs The Moment Love Ki Lehrein

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top