
Oscars 2022 : कानशिलात लगावणं विल स्मिथच्या अंगाशी, नेटफ्लिक्सनेही घेतला मोठा निर्णय
Oscars 2022 : चित्रपट विश्वातील कलाकारांच्या गौरवसोबतच यंदाचा ऑस्कर सोहळा आणखी एका कारणाने चांगलाच गाजला. ते म्हणजे कानाखाली प्रकरण. या सोहळ्याला काही दिवस उलटून गेले असले तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. पत्नीवरील थट्टा खटकल्याने सूत्रसंचालक म्हणून उभा असलेल्या ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथ याने कानाखाली लगावली. एका प्रतिष्ठित सोहळ्यात सर्व मर्यादा ओलांडून एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला मारणे हे निंदनीय असल्याची टीका देशभरातून करण्यात आली. विल स्मिथ याने ख्रिस रॉकची माफी मागितली असली तरी आता हे कानाखाली प्रकरण वाढीस लागले असून स्मिथ यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
हेही वाचा: चंद्रमुखीच्या तेजाने filmfare magazin लखाखतंय.. अमृता ठरली पहिली मराठी अभिनेत्री..
या प्रकरणानंतर स्मिथ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे ऑस्करचे आयोजक 'द अकॅडेमी'ने जाहीर केले होते. त्यानंतर स्मिथला पुरस्कार परत करावा लागेल असे अनेकांना वाटले परंतु तसे न करता स्मिथ याने थेट 'द अकॅडेमी'चा राजीनामा दिला. हे प्रकरण अजून ताजे असतानाच आता नेटफ्लिक्सने स्मिथला मोठा धक्का दिला आहे. विल स्मिथ करत असलेल्या एका चित्रपटाची निर्मिती नेटफ्लिक्सने थांबवली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत अद्याप नेटफ्लिक्सकडून खुलासा झाला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सने कठोर निर्णय घेत विल स्मिथचा आगामी चित्रपट ‘Fast and Loose’ची निर्मिती थांबवली आहे.
हेही वाचा: गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून.. निवेदिता सराफ झाल्या भावुक..
एका माध्यमाच्या वृत्तानुसा ऑस्कर पुरस्काराच्या एक आठवडा आधी दिग्दर्शक डेव्हिड लीच यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. लीच यांनी हा प्रोजेक्ट सोडत रयान गॉसलिंग यांचा ‘Fall Guy’ हा प्रोजेक्ट निवडला. ज्याची निर्मिती येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यात हे कानाखाली प्रकरण घडल्याने नेटफिल्क्सने स्मिथच्या चित्रपटाची निर्मिती थांबण्याचा निर्णय घेतला. तर 'द अकॅडेमी' मध्येही विल स्मिथ प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी येत्या १८ एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Web Title: Netflix Stalls Will Smiths Film Fast And Loose After Oscars
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..