चंद्रमुखीच्या तेजाने filmfare magazin लखाखतंय.. अमृता ठरली पहिली मराठी अभिनेत्री.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta khanvilkar

चंद्रमुखीच्या तेजाने filmfare magazin लखाखतंय.. अमृता ठरली पहिली मराठी अभिनेत्री..

filmfare marathi : मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) सध्या चांगलीच चर्चेत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ (Chandrakmukhi ) हा तिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या ती बऱ्याच ठिकाणी भेट देत असते. काही दिवसांपूर्वीच एका सोहळ्यात चंद्रमुखी ची भूमिका अमृता खानविलकर साकारणार असल्याची घोषणा झाली, यावेळी अमृताचा नृत्याविष्कार पाहून चाहते घायाळ झाले. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता एक नवी आनंदवार्ता समोर आली आहे.

हेही वाचा: Filmfare Marathi : फिल्मफेअरमध्ये 'धुरळा'.. सर्वाधिक पुरस्काराचा मानकरी

ती आनंदवार्ता म्हणजे, बहुचर्चित फिल्मफेअर मॅगझीन (filmfare magazin)च्या कव्हर पेजवर यंदा अमृता खानविलकर झळकली आहे. आजवर या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर केवळ बॉलीवूड अभिनेत्रीची दखल घेतली जात होती. पण प्रथमच एका मराठी अभिनेत्रीने हा मान मिळवला आहे. सध्या हे कव्हरपेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून अमृताविषयी अभिमान व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: आर के हाऊसमध्ये रणबीर आलिया घेणार सात फेरे,माहीती झाली उघड..

चंद्रमुखीचे दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak) यानेही हे कव्हरपेज शेअर करत अमृतावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'अभिमान, प्रेम, अभिनंदन. 'FILMFARE'च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली मराठी अभिनेत्री तू ठरली आहेस. अमृताचा प्रचंड प्रचंड अभिमान वाटतोय. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझी चिकाटी गेली दोन अडीच वर्ष जवळून बघतोय. त्यासाठी तुला खूप खूप प्रेम. हा बहुमान तुला मिळाला याबद्दल तुझं खूप खूप खूप अभिनंदन. आपली #चंद्रा ठरली आहे FILMFARE च्या DIGITAL COVER PAGE वर झळकणारी पहिली मराठी अभिनेत्री.' असे गौरवाचे आणि प्रेमाचे शब्द त्याने अमृतासाठी लिहिले आहेत.

हेही वाचा: शरद केळकर आणि किशोर कदम एकत्र, 'ऑपरेशन रोमिओ'मध्ये महत्वाच्या भूमिका

तर अमृताही याविषयी व्यक्त झाली आहे. या कव्हरपेजचा फोटो शअर करत तिने म्हंटले आहे की, 'ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी गुढीपाडव्याची मोठी भेट आहे…. "@filmfare" कव्हर गर्ल... मी अक्षरशः याचं स्वप्न पाहिलं होतं आणि यासाठी कठोर परिश्रम केले आणि याची अगदी धीराने, या सोनेरी क्षणाची वाट पाहिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.'

Web Title: Amruta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..