मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे मुलाच्या चिंतेत काकुळतीला आल्यात

किशोरी शहाणे यांनी आपला 25 वर्षीय मुलगा बॉबी याच्याविषयीचं मनातलं दुःख थेट प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवलं.
Kishori Shahane with her son Bobby Vij
Kishori Shahane with her son Bobby Vij Google
Updated on

अभिनय क्षेत्रात जवळ-जवळ ३५ वर्ष काम करुनही अभिनेत्री किशोरी शहाणे(Kishori Shahane) यांना आजही या क्षेत्राविषयी अनेक गोष्टी खटकत आहेत. खरंतर किशोरी शहाणे यांनी केवळ मराठीत नाही तर हिंदी सिनेमा,मालिकांमध्येही काम करुन आपलं नाव कमावलं आहे.आजही त्या हिंदी मालिकांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कुंटुंबाचं तसं पहायला गेलं तर बॉलीवूडशी जवळचं कनेक्शन आहे. पण असं असलं तरी किशोरी शहाणे यांचं बॉलीवूड बद्दल फारसं चांगलं मत नाही. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत बॉलीवूडमधील 'नेपोटिझम'चा उल्लेख करीत खंत व्यक्त केली आहे. आपल्या मुलामध्ये अभिनयासाठी गरजेचे असणारे सगळे गुण आहेत,त्याचे लूक्स आहेत तरी अद्याप त्याला ब्रेक मिळालेला नाही,तो स्ट्रगल करतोय अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

Kishori Shahane with her son Bobby Vij
Gehraiyaan:'माझ्या कुटुंबाची युक्रेनमध्ये जगू किंवा मरू अवस्था'- दार गाई

किशोरी शहाणे यांचं सासर हे बॉलीवूडच्या अगदी जवळचं. म्हणजे त्यांचे पती दीपक बलराज हे बॉलीवूडचे दिग्दर्शक. त्यांचा उल्लेख करत त्या आपल्या मुलाखतीत म्हणाल्या की,''माझ्या पतीनं बाबा सेहगल,रोनित रॉय,अली असगर अशा त्यावेळी नव्यानं अभिनय क्षेत्रात येऊ पहाणाऱ्या न्यू कमर्सना संधी दिली होती,जे पुढे जाऊन स्टार झाले. पण आज तसं होताना दिसत नाही. आणि त्यामुळे बॉलीवूडमध्ये करिअर करणं खूप कठीण होऊन बसलंय''. किशोरी शहाणे यांचा २५ वर्षीय मुलगा बॉबी(Bobby Vij) याला सिनेक्षेत्रात करिअर करायचं आहे. पण त्याला अद्याप हवा तसा ब्रेक मिळालेला नाही.

Kishori Shahane with her son Bobby Vij
नसिरुद्दीन शाहा देतायत विचित्र आजाराशी झुंज;सिनेमात काम करणं झालं अवघड

आपल्या मुलाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ''माझा मुलगा लहान असल्यापासून थिएटरमध्ये काम करीत आहे.आम्हाला वाटलं त्याचं काम पाहिल्यावर काम नक्की मिळेल. जर आम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीला दिली आहेत तर आमच्या मुलाला काम नक्की मिळायला हवं. तो सगळ्याच बाबतीत निपुण आहे. आणि त्याच्या मधील टॅलेंटवर आम्हाला विश्वास आहे. तो ज्यांच्या ज्यांच्याकडे कामासाठी गेला आहे,ते तासन तास त्याच्यासोबत बोलतात पण पुढे काहीच घडत नाही. गोष्ट तिथेच थांबते. टॅलेंट पाहून काम द्या,आमच्या नावावर काम देऊ नका,पण संधी द्या'', असं काकुळतीला येऊन किशोरी शहाणे बोलल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com