
युक्रेनियन फिल्ममेकर दार गाई हिचं नाव आज 'गहराइयां' (Gehraiyaan)सिनेमामुळे बॉलीवूडमध्ये आणि भारतातही प्रत्येकाच्या परिचयाचं झालं आहे. तिनं नुकतंच युक्रेनमध्ये युद्धभूमीवर अडकलेल्या आपल्या कुटुंबासाठी चिंता व्यक्त केली आहे. आपलं युक्रेनमध्ये फसलेलं कुटुंब कसं रशिया-युक्रेन युद्धाला सामोरं जातंय याबद्दलही बोलून दाखवलं आहे.
दार गाई आपल्या नवऱ्यासोबत कामानिमित्तानं मुंबईत(Mumbai) राहत आहे. दार गाई हिनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दीपिकाच्या(Deepika Padukone) 'गहराइयां' सिनेमासाठी इंटिमसी डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळे अर्थातच तिचं नाव चर्चेत होतं. ती मुंबईत राहत असली तरी तिचं संपूर्ण कुटुंब हे युक्रेनमध्ये राहतं. त्यामुळे युद्ध जरी यु्क्रेनमध्ये सुरू असलं तरी मुंबईत राहणाऱ्या दार गाईची अवस्था खूपच बिकट झाली आहे. तिनं याविषयी सांगताना स्पष्टिकरण दिलं आहे की, तिचे बरेच नातेवाईक देशाच्या वेगवेगळ्या भागात जीव वाचवण्यासाठी लपून बसले आहेत. दार गाई ही युक्रेनची राजधानी 'किव्ह' मध्येच लहानाची मोठी झाली आहे. आपल्या वयाची तब्बल २२ वर्ष तिनं तिथे काढली आहेत. कुटुंबासोबत आपल्या मित्रमैत्रिणींच्या सुरक्षेविषयी देखील आपण चिंतीत आहोत असं दार गाई हिनं म्हटलं आहे. तिचे आई-वडील 'किव्ह' मध्ये काही दिवस अडकले होते पण आता ते तिथनं बाहेर पडलेयत.
तिनं याविषयी स्पष्टिकरण देताना सांगितले की,माझे आई-वडील काही दिवस किव्ह मध्ये अडकले होते. कारण सगळेच लोकं तिथनं बाहेर पडायचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे भरपूर ट्रॅफिक रस्त्यांवर होते. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता. पण त्यानंतर ते कसेबसे किव्हपासून केवळ ४५ मिनिटे अंतरावर असलेल्या आमच्या गावाला निघून गेले आहेत.
आपली ७८ वर्षांची आजी कसं आपलं घर सोडून जायला तयार होत नव्हती याविषयीचा अनुभवही तिनं सांगितला. तिला तिथेच राहून या संकटाशी दोन हात करायचे होते. ती सर्वांना म्हणत होती,''आपण इथेच राहून लढूया. त्यामुळे माझ्या आई आणि भावानं घरातील इतर महिला आणि लहान मुलांना सुऱक्षित ठिकाणी सोडण्यासाठी तिथून निघायचं ठरवलं, पण माझ्या गावाला जाणाऱ्या मार्गाला जोडणारा ब्रीज बॉम्ब हल्ल्यात नेस्तनाबूत झाला अन् त्यांना पुढे जायचा मार्ग मिळेना. ते युक्रेनमध्येच कुठेतरी अडकले . आणि परत किव्हला परतण्यासाठी मार्ग शोधू लागले.पण अखेर ते कसेबसे पुन्हा किव्ह मध्ये पोहोचले आणि तिथनं आमचं गाव गाठलं. पण अजुनही कशाचाच भरोसा देता येत नाही. उद्या काय घडेल याची चिंता फोन वाजला की अधिक तीव्र होते.'' युक्रेनमध्ये लहानाची मोठी झाल्यानंतर दार गाई भारतात शिक्षण घेण्यासाठी आली. तिनं दिग्दर्शनात पदार्पण करण्यापूर्वी मुंबईत पटकथा लिहिण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. २०१८ मध्ये तिनं दोन सिनेमांतं दिग्दर्शन केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.