
'सरफरोश','वेन्सडे' या आणि अशा अनेक सिनेमांतून आपल्या सहजसुंदर अभिनयानं गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेत नसिरुद्दीन शाहा(Naseeruddin Shah) यांनी आपल्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. सध्या ते एका गंभीर स्वरुपाच्या आजाराशी झुंज देत आहेत ज्यामुळे माणूस बोलता बोलता एका वाक्यावरच थांबतो,अन् पुन्हा पुन्हा तेच वाक्य बोलत राहतो. या आजाराला 'ओनोमॅटमानिया' असं म्हणतात असं त्यांनीच एका मुलाखतीत आपल्या या आजाराविषयी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे या आजाराविषयी स्पष्ट करताना सांगितलं की,''बोलता बोलता माझ्या तोंडातच माझं वाक्य,बोलणारा शब्द अडकतो आणि कितीही मी पुढे बोलायचा प्रयत्न केला तरी मी बोलू शकत नाही,मी तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत राहतो अन् त्यामुळे मी हतबल होतो''.
आपल्या या आजाराविषयी स्पष्टिकरण देताना नसिरुद्दीन शाहा पुढे म्हणाले की,''मी हे फक्त एक वाक्य,एक शब्द याविषयीच बोलत नाही. तर 'ओनोमॅटोमानिया आजारात आपण एखादा मोठा संवाददेखील सारखं सारखं बोलत राहतो,कोणत्याही कारणाशिवाय. आणि माझ्या बाबतीत आजकाल हे असं वारंवार घडत आहे. त्यामुळे मी आराम देखील नीट करु शकत नाही. मी झोपेतही या आजाराचा सामना करतो. मी झोपेत अचानक उठतो आणि माझ्या घरातल्या एखाद्या आवडीच्या कोपऱ्यात सारखा जाऊन बसतो. आणि कोणी कितीही मला तिथून उठवून झोपवलं परत तरी मी वारंवार ती कृती करीत राहतो. त्याक्षणी मला हे देखील आठवत नाही की मी आता झोपलो होतो. किंवा रात्रीचे किती वाजलेयत याचा काहीच संबंध त्यावेळी राहत नाही. आणि हे मी विनोदानं सांगत नाहीय. तर सध्या मी अशा अवस्थेतून जात आहे''. नसिर यांच्या अशा अवस्थेबद्दल जाणून घेतल्यावर सिनेमात काम करणं त्यांना किती सहज शक्य होईल यापुढे हे समजणं थोडं कठीणच जातंय.
नसिरुद्दीन शाहा यांचा आइनस्टाइन लूक नुकताच आपण सगळ्यांनी पाहिला असेल तो शाहिद कपूरच्या बहिणीच्या लग्नात. अर्थात घरचे संबंध असल्यामुळे संपू्र्ण शहा कुटुंब कपूर फॅमिलीच्या या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झालं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत नसिर यांच्या आइनस्टाइन लूकची चर्चा रंगली होती. नसिरुद्दीन शाहा यांना आपण 'गहराइंयां' सिनेमात नुकतंच पाहिलं असेल. त्यांनी दीपिका पदूकोणच्या(Deepika padukone) वडिलांची भूमिका या सिनेमात केली आहे. 'कौन बनेगा शिखरवती' या वेबसिरीजमध्ये देखील ते दिसले होते. या सीरिज मध्ये लारा दत्ता,सोहा अली खान महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.