Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: लहान मुलांच्या गाण्यांना तर सोड रे ! योयोसोबत भाईजानचा नर्सरी सॉन्गवर लुंगी डान्स..

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Lets Dance Chotu Motu
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Lets Dance Chotu Motu Esakal

Lets Dance Chotu Motu: सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोनच दिवस शिल्लक आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलिज होण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान चित्रपटाची संपुर्ण टिम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सलमान खानच्या या चित्रपटातील गाणेही रिलिज होत आहे. याआधी KKBKKJ च्या 'नैयो लगदा', 'बिल्ली बिल्ली', 'जी रहें थे हम', 'बठुकम्मा' आणि 'येंतम्मा' या गाण्यांनाही प्रेक्षकांनी दाद दिली होती. त्याला भरभरून प्रेम मिळाले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Lets Dance Chotu Motu
Shaakuntalam BO Collection: सामंथाचा 'शाकुंतलम' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पाचव्या दिवसाची कमाई जाणून बसेल धक्का

आता सलमानच्या या चित्रपटाचे नवीन गाणे रिलिज केले आहे. 'लेट्स डान्स छोटू मोटू' असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचे टायटल जितकं फनी आहे. तितकच या गाण्याच्या ओळीही फनी आहे. या गाण्यामध्ये तुम्हाला नर्सरी राइम्स ऐकायला मिळतील.

यो यो हनी सिंगने या गाण्यात रॅप केले आहे आणि त्याच्याशिवाय या गाण्यात सर्वजण नर्सरी राइम्स गातांना दिसत आहेत. या गाण्यात ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारपासून जॉनी जॉनीपर्यंत सर्वच गाणी ऐकायला मिळणार आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Lets Dance Chotu Motu
Surekha Sikri: नजरेत धाक आणि आवाजात जरब.. 'त्या'वेळी सुरेखा सिक्री यांनी सरकारलाही धरलं होतं धारेवर..

मात्र या गाण्यापेक्षा जास्त फनी या गाण्यावरील डान्स आहे. यात सलमान खान, पूजा हेगडे, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, हनी सिंग हे सर्वजण या गाण्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. या गाण्यात सलमानचा डान्स पाहिल्यानंतर नेटकरींनी मात्र सलमानची खुपच खेचली आहे.

सलमान यात डान्स करतांना साउथ सुपरस्टार यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याला ते जमलेलं नाही. तसा डान्स करण्याऐवजी काहीतरी विचित्र पद्धतिने सलमान नाचला आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी सलमानची खिल्ली उडवली आहे.

याआधीही त्याचा रोमँटिक ट्रॅक 'नईयो लगदा' ट्रोल झाला होता. त्यावेळीही सलमानच्या डान्सची खुप खिल्ली उडवली होती. आता सोशल मीडिया यूजर्स सलमानच्या 'लेट्स डान्स छोटू मोटू' गाण्याची खिल्ली उडवत आहेत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
Lets Dance Chotu Motu
Priyanka Chopra: पहिल्यांदाच भारतात आलेली प्रियांका चोप्राची मुलगी मालतीला कसा वाटला देश? अभिनेत्री म्हणाली...

नेटकऱ्यांनी या व्हिडिओंना खुपच प्रतिक्रिया दिल्या आहेत . त्यात एकानं लिहिलयं की, सलमानला नेमकं करायचं काय आहे.,तर दुसऱ्याने लिहिलयं की, किती गाणी आहे चित्रपटात, तर काहींनी त्याला साउथ स्टारची कॉपी करु नको असा सल्लाही दिला आहे. तर काहींनी सलमानच्या डान्सला खुप नावं ठेवली आहेत.

चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान आणि पूजा हेगडे व्यतिरिक्त KKBKKJ स्टार्स शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत. 21 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com