Salman Khan: भाईजानसाठी पब्लिक खुळी! किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला..

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या फॅन फॉलोविंगची फक्त भारतातच नव्हे तर जगभर चर्चा असते.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on TwitterEsakal

Salman Khan News: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या फॅन फॉलोविंगची फक्त भारतातच नव्हे तर जगभर चर्चा असते. त्यातच आघाडीचं नाव म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.

सलमान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातील सगळेच गाणे हिट झाले असून सलमानच्या चाहत्यांना त्याचा लुंगी डान्सही खुप आवडला आहे. (Latest Marathi News)

सलमान खानच्या या चित्रपटाचा टिझर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटासोबत रिलिज करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे गाणे रिलिज करण्यात आलीत. यात सलमानच्या चाहत्यांना त्याची आणि पुजा हेगडेची जोडी खुप आवडली आहे. (Marathi Tajya Batmya)

या चित्रपटाचा ट्रेलरची चाहत्यांना खुप प्रतिक्षा लागून होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्याच्या भेटीला येणार आहे. मात्र सलमानचे चाहते इतके उत्सूक आहेत की त्यामुळे #KisiKaBhaiKisiKiJaanTrailer हा हॅशटॅगच ट्विटरला ट्रेंड होत आहे.

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. पण त्याआधी आज निर्माते चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत. यावरून सलमान खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. किसी का भाई किसी की जान ट्रेलर हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.

सलमानचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजबद्दल सतत ट्विट करत आहेत. सलमानच्या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत असल्याच ते ट्विट करत सांगत आहेत.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter
Kamakhya Devi: शिंदे गटापाठोपाठ आता बॉलीवूडमध्ये कामाख्या देवीची क्रेझ, प्रीती पोहचली गुवाहाटीला

आज संध्याकाळी ६ वाजता हा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. यासाठी मुंबईत एक लाँच इव्हेंटही आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमान खान देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सलमान सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे अधिक प्रमोशन करत आहे.

याचे अनेक व्हिडिओ आणि मिम्सही ट्विटर वर व्हायरल होत आहेत. ज्यात सलमानचे चाहते किती उत्सुक आहेत हे दिसत आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter
Shah Rukh Khan: 'किंग ऑफ हार्ट', कोलकातामध्ये अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची शाहरुखने घेतली भेट
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter
Kangana Ranaut: अन् शेवटी कंगनालाही तिच्या स्वप्नाचा राजकुमार भेटलाच? फोटो शेअर करत म्हणाली,

याआधी सलमानने पोस्ट करत ट्रेलर रिलिजविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर करताना चित्रपटाचे नवीन पोस्टरही शेअर केले होते. सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उद्या किसी की भाई किसी की जानचा ट्रेलर तुमच्या भाऊ आणि जानसोबत बघा'.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer hashtag trending on Twitter
Sakal Premier Award : ठाण्यात ‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड्स’ सोहळा; रकुल प्रीत सिंह, श्रिया पिळगावकर यांचा विशेष सन्मान

या चित्रपटात पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय व्यंकटेश दग्गुबती, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, राघव जुयाल आणि विनाली भटनागर हे कलाकारही दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट 21 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com